सिंदखेड ठाण्यात आरोपीचा शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:30 AM2018-04-12T00:30:23+5:302018-04-12T00:30:23+5:30

किनवट तालुक्यातील मौजे सारखणी येथील कापूस खरेदीच्या दुकानात झालेल्या दरोडा प्रकरणात अटकेतील आरोपीने सिंदखेड पोलीस ठाण्यातील शौचालयात धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ११ एप्रिल रोजी सकाळी घडली़ या घटेनमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती़

the accused tried to commit suicide in police station | सिंदखेड ठाण्यात आरोपीचा शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न

सिंदखेड ठाण्यात आरोपीचा शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : किनवट तालुक्यातील मौजे सारखणी येथील कापूस खरेदीच्या दुकानात झालेल्या दरोडा प्रकरणात अटकेतील आरोपीने सिंदखेड पोलीस ठाण्यातील शौचालयात धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ११ एप्रिल रोजी सकाळी घडली़ या घटेनमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती़
शेख असिफ शेख शम्मी असे आरोपीचे नाव असून ९ मार्च रोजी सारखणी येथील रुपेश सुभाषलाल जयस्वाल यांच्या कापूस खरेदीच्या दुकानात शेख असिफ शेख शम्मी (रा़इस्लामपुरा, किनवट), बाबूलाल जाधव, मनोहर श्रीरामे (दोघे रा़किनवट), शेख सलमान शेख सलीम (रा़दहेली) यांनी दरोडा टाकून १ लाख ३५ हजार ६३० रुपये रोख, मोटारसायकल, चेकबूक लांबविले होते़ सिंदखेड ठाण्यात याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला़ घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले होते़ यातील शेख असिफ हा पुणे येथे असल्याची माहिती मिळताच सिंदखेड पोलिसांनी पुणे येथे जावून त्याला अटक केली होती़
न्यायालयाने त्याला ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते़ सिंदखेड पोलीस ठाण्यातील कोठडी संपल्याने त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार होते़
सकाळी पावणेसात वाजता त्याने शौचालयाचे निमित्त करून शौचालयास जायचे आहे असे सांगितले़ यावेळी कोठडीच्या बाहेर असलेल्या पोलीस कर्मचाºयाने त्याला ठाण्यातीलच शौचालयात नेले़ परंतु बराच वेळ तो बाहेर न आल्याने शौचालयाचा दरवाजा तोडण्यात आला़ तेव्हा त्याच्या गळ्यातून रक्त येत असल्याचे निदर्शनास आले़ यावेळी उपस्थित सपोनि एम़ डी़ शिवरकर, फौजदार संजय चव्हाण यांच्यासह अन्य पोलिसांनी त्याला सिंदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पोलीस वाहनाद्वारे माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले़
माहूरमध्ये उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला यवतमाळला हलविण्यात आले़ यवतमाळ येथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती शिवरकर यांनी दिली़ या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली़

Web Title: the accused tried to commit suicide in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.