गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:10 AM2018-11-02T01:10:16+5:302018-11-02T01:12:33+5:30

तब्बल तीन महिने लोटले तरी अद्याप मोकाटच असून पिडीतानांच पोलिसांकडून सबुरीचे सल्ले मिळत असल्याने लोकांत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे़

The accused, who has been accused, will be released for three months | गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट

गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट

googlenewsNext
ठळक मुद्देबोगस क्रेडीट सोसायटीअनेकांना लाखो रूपयांना फसविले

बा-हाळी : येथे महाराष्ट्र अर्बन को़ क्रेडीट सोसायटी या नावाने बोगस शाखा काढून शेतकरी, व्यापारी व कर्मचारी भरतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद होवून तब्बल तीन महिने लोटले तरी अद्याप मोकाटच असून पिडीतानांच पोलिसांकडून सबुरीचे सल्ले मिळत असल्याने लोकांत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे़
बाºहाळीत १६ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अर्बन कोक़्रेडीट सोसायटीच्या नावाने बोगस शाखा सुरुवात करण्यात आली़ यात स्वयंघोषित बँक संचालक सुनील दिंडे, विभागीय व्यवस्थापक संदीप वाघमारे, कोअर कमिटी सदस्य मुबारक भांडे, लक्ष्मण गायकवाड, बाºहाळी शाखा व्यवस्थापक विजय राठोड यांचा मुख्य सहभाग होता़ या पाच जणांनी मिळून जवळपास १७ लोकांना कर्मचारी म्हणून नेमणूक केली़ यात त्यांच्याकडून लाखो रुपये गोळा केले़ त्यानंतर या कर्मचा-यामार्फत एका महिन्यात ११६ बचत खाती, ८० पिग्मी खाती, १५ चालू खाती उघडण्यात आली व त्या माध्यमातून बा-हाळीतील शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्याकडल लाखो रुपयांवर डल्ला मारला़
या कारवाईनंतर पोलिसांनी पिडीत लोकांना त्वरित आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देवून शांत केले होते़ पण तब्बल तीन महिने लोटले तरी पोलिसांना आरोपी सापडतच नाहीत़
विशेष म्हणजे उदगीर व बा-हाळी परिसरात पिडीत लोकांना वरील पाचही आरोपी तक्रार मागे घेण्यासाठी अनेकदा संपर्क करीत आहेत़ हे पोलिसांना माहीत असतानाही जाणीवपूर्वक कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही़ विचारणा करण्यासाठी गेलेल्या पिडीत व्यक्तीलाच पोलिस सबुरीचा सल्लार देत असल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयीच शंका येत आहे़

१७ लोकांना दिली होती नोकरी
बा-हाळीत १६ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अर्बन कोक़्रेडीट सोसायटीच्या नावाने बोगस शाखा सुरु केली़ यामध्ये बँक संचालक सुनील दिंडे, विभागीय व्यवस्थापक संदीप वाघमारे, कोअर कमिटी सदस्य मुबारक भांडे, लक्ष्मण गायकवाड, शाखा व्यवस्थापक विजय राठोड यांनी १७ लोकांना कर्मचारी म्हणून नेमणूक केली़
या कर्मचा-यामार्फत एका महिन्यात ११६ बचत खाती, ८० पिग्मी खाती, १५ चालू खाती उघडण्यात आली व त्या माध्यमातून बाहाळीतील शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्याकडल लाखो रुपयांवर डल्ला मारला़ त्यावेळी पोलिसांनी पिडीत लोकांना आरोपींना त्वरीत अटक करण्याचे आश्वासन दिले होते़
आरोपींनी उदगीर, जळकोट येथील लोकांनाही घातला होता लाखोंचा गंडा
या प्रकरणातील पाच आरोपींनी उदगीर, जळकोट जि़ लातूर येथेही असाच प्रकार केल्याचे लक्षात आल्याने रोहीत लक्ष्मण पवार यांनी ९ आॅगस्ट २०१८ रोजी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद केला़ त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी शटर उघडून आतील कागदपत्रे व साहित्याचा ताबा घेतला़यावेळी संगणक गायब असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़

Web Title: The accused, who has been accused, will be released for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.