नांदेड जिल्ह्यात ६६ परवानाधारक मद्यविक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:41 PM2018-11-11T23:41:15+5:302018-11-11T23:41:58+5:30
बारमध्ये ग्राहकांच्या असुविधेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ५० हजारापर्यंतचा दंडही ठोठावू शकते़ दरम्यान, गत सहा महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ अशी माहिती अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली़
नांदेड : वेळेच्या अगोदर मद्यविक्रीची दुकाने उघडून रात्री उशिरापर्यंत ती सुरु ठेवणाऱ्या तसेच बारमध्ये असुविधा असलेल्या परवानाधारक ६६ मद्य विक्रेत्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे़ बारमध्ये ग्राहकांच्या असुविधेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ५० हजारापर्यंतचा दंडही ठोठावू शकते़ दरम्यान, गत सहा महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ अशी माहिती अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली़
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटेच मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतात़ त्यानंतर रात्री उशिरापर्यत ती सुरु ठेवण्यात येतात़ त्याचबरोबर अनेक ठिकाणी ग्राहकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसते़ प्रसाधनगृह, किचन यासह इतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाºया परवानाधारक ६६ मद्य विक्रेत्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या सहा महिन्यात कारवाईचा बडगा उगारला आहे़ त्याचबरोबर एप्रिलमध्ये १५४, मे-१३८, जून-१३५, जुलै-१३४, आॅगस्ट-१३१ व सप्टेंबरमध्ये ११७ असे एकुण ८०९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये गुणात्मक गुन्ह्यांची संख्या २४ आहे़
या प्रकरणात ५६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ५६ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत़ या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ गतवर्षी एकुण ७७१ गुन्हे नोंदविण्यात आले होते़ तर १४ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ गेल्या सहा महिन्यांमध्ये अवैध दारु विक्रीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहिम तीव्र केली आहे़ दरम्यान, वारंवार अवैध दारु विक्रीचे गुन्हे करणाºया आरोपींना जरब बसावी यासाठी त्यांच्या विरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तयार करुन पाठविण्यात आले आहेत़
जप्त वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी
४राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय हे किरायाच्या इमारतीत आहे़ त्यामुळे या ठिकाणी जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जागाच नाही़ त्यावर तोडगा म्हणून एका ठिकाणी जागा किरायाने घेवून त्या ठिकाणी ही वाहने ठेवण्यात येत आहेत़ परंतु ही जागाही आता अपुरी पडत आहेत़ त्यामुळे जप्त केलेली वाहने नेमकी ठेवायची कुठे? असा प्रश्न विभागाला पडला आहे़