जिल्ह्यात मद्यपींविरुद्धची कारवाई थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:57+5:302021-07-07T04:22:57+5:30
ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंदच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाहतूक शाखा आणि पोलिसांकडून ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी ...
ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंदच
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाहतूक शाखा आणि पोलिसांकडून ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करायची कशी, हा प्रश्न आहे. अनेक वाहनचालक पोलिसांसोबत याच विषयावर हुज्जतही घालत आहेत. परिणामी कारवाईवर मर्यादा येत आहेत. ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यास परवानगी मिळाल्यानंतर कारवाईची संख्या निश्चितपणे वाढणार आहे.
मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरूच
नांदेड शहर वाहतूक शाखेच्या वतीने मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई सुरूच आहे. ब्रेथ ॲनालायझरचा वापर थांबला असला तरीही वाहनचालकांच्या वर्तणुकीवरून त्याने मद्य प्राशन केले की नाही, हे समजते. त्यानुसार कारवाई सुरूच आहे. शहरात जवळपास ५५ ते ६० वाहनचालकांविरुद्ध दारू पिवून वाहन चालविल्याप्रकरणी दरमहा कारवाई होत असते. वाहतूक शाखेकडून मद्यपी वाहनचालकांचा शोध घेतला जातो. यातून अपघात रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
चंद्रकांत कदम, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, नांदेड