प्लास्टिक उत्पादन, साठवणूक, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:02 AM2019-01-30T01:02:38+5:302019-01-30T01:03:06+5:30
शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक आणि त्यापासून होणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात व वाहतूक करणांºयाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्लास्टिक बंदीबाबत जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. पहिल्या अपराधासाठी पाच हजार रुपये, दुसºया दहा आणि त्यानंतरच्या अपराधासाठी २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
नांदेड : शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक आणि त्यापासून होणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात व वाहतूक करणांºयाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्लास्टिक बंदीबाबत जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. पहिल्या अपराधासाठी पाच हजार रुपये, दुसºया दहा आणि त्यानंतरच्या अपराधासाठी २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाची अधिसूचना २३ मार्च २०१८ नुसार नांदेड शहरात प्लास्टिक व त्यापासून बनविल्या जाणाºया पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), थर्माकॉल (पॉलिस्टायरिन), प्लास्टिकपासून बनविण्यात येणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया डिस्पोजेबल वस्तू, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बॅग्स, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य पदार्थ साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टन, इत्यादींचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर सजावटीमध्ये करण्यास बंदी आहे.
व्यवसायधारक व नागरिकांनी शासनाने निर्बंध घातलेल्या सर्व प्लास्टिक व त्यापासून तयार होणाºया वस्तूंची उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करणाºयांविरुद्ध शासन अधिसूचनेनुसार पहिल्या अपराधासाठी दंड ५ हजार रुपये, दुसºया अपराधासाठी दंड १० हजार रुपये आणि नंतरच्या अपराधासाठी २५ हजार रुपये व तीन महिन्यांपर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा होईल, याची सर्व व्यवसायधारक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन केले.
यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा प्रशासन अधिकारी, मनपाचे उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, मनपाचे सहाय्यक आयुक्त (स्वच्छता), क्षेत्रीय अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.