जादा दराने बियाणे विक्री केल्यास कारवाई : कृषी सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:13+5:302021-06-24T04:14:13+5:30

रावणगावकर यांनी २२ जून रोजी नवा मोंढा भागातील संतोष बीज भांडार, बालाजी कृषी सेवा केंद्र, मामडे कृषी सेवा केंद्र ...

Action in case of sale of seeds at extra rate: Agriculture Chairman | जादा दराने बियाणे विक्री केल्यास कारवाई : कृषी सभापती

जादा दराने बियाणे विक्री केल्यास कारवाई : कृषी सभापती

Next

रावणगावकर यांनी २२ जून रोजी नवा मोंढा भागातील संतोष बीज भांडार, बालाजी कृषी सेवा केंद्र, मामडे कृषी सेवा केंद्र आदी दुकांनाना भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या कार्यालयात व्यापाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी रावणगावकर म्हणाले, सोयाबीन बियाण्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून, इतर बियाण्यांप्रमाणे छापील किंमत स्थिर राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. छापील किंमती स्थिर ठेवण्याबाबत बुधवारी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव घेऊन शासनास पाठविण्यात येईल. व्यापाऱ्यांनी रासायनिक खताची विक्री ई-पॉस मशीनद्वारे करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सोयाबीनसोबतच तूर, मूग, उदीड, कापूस आदी बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतचा आढावा रावणगावकर यांनी यावेळी घेतला. शेतकऱ्यांनी शंभर मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, येत्या दोन -तीन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. यावेळी सोयाबीन बियाणे पुुन्हा उपलब्ध होणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर पेरण्यास प्राधान्य द्यावे, असे यावेळी चलवदे यांनी सांगितले.

या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चलवदे, जिल्हा गुुणनियंत्रण अधिकारी जी. व्ही. गिरी, प्रभारी मोहीम अधिकारी जी. एन. हुंडेकर, तालुका कृषी अधिकारी आर. सी. राऊत, विक्रेते मधुकर मामडे, विपीन कासलीवाल आदींंची उपस्थिती होती.

.......................

Web Title: Action in case of sale of seeds at extra rate: Agriculture Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.