कर वसुलीसाठी सिडको तरोडा झोनमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:56+5:302021-03-15T04:16:56+5:30
महापालिकेने मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर कर वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सिडको कार्यालयाअंतर्गत सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे यांच्या ...
महापालिकेने मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर कर वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सिडको कार्यालयाअंतर्गत सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे यांच्या पथकाने धनादेशाद्वारे १ लाख ३१ हजार ८८५ रुपयांचा कर जमा केला. त्याचवबरोबर इतर मालमत्ताधाकरांनीही कराचा भरणा करण्यासाठी धनादेश दिले. या पथकात सुधीरसिंह बैस, व्यंकट गायकवाड, मारोती सारंग यांचा समावेश होता. तर रविवारी तरोडा सांगवी कार्यालयाअंतर्गत सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या पथकाने तरोडा बु. भागातील ५ लाख ४५ हजार ६६० रुपयांच्या करापोटी ३५ प्लॉट जप्त केले आहेत. तरोडा खु. येथील मालमत्ता धारकाने जप्तीची कारवाई टाळण्यासाठी १ लाख ३७ हजार रुपयांचा धनादेश दिला. तर अन्य दोन मालमत्ता धारकांनी १ लाख रुपयांचे धनादेश दिले. या ठिकाणी कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. या पथकात श्याम कानोटे, साहेबराव ढगे, संतोष जिंतूरकर, कमलेश छुट्टे, सुरेश इंगोले यांचा समावेश होता.