कारवाई एफडीएची,लाभ शुक्राचार्यांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:09 AM2019-01-05T01:09:12+5:302019-01-05T01:09:46+5:30

शहरात अवैधपणे सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी मारुन पाच पानटपरी चालकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ त्यानंतर गुटखा विक्रीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी, प्रत्यक्षात पोलीस दलातील काही शुक्राचार्यांनी या संधीचाही लाभ घेतला आहे़

Action FDA, the benefit of the spies! | कारवाई एफडीएची,लाभ शुक्राचार्यांना !

कारवाई एफडीएची,लाभ शुक्राचार्यांना !

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाच्या धाडी

नांदेड : शहरात अवैधपणे सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी मारुन पाच पानटपरी चालकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ त्यानंतर गुटखा विक्रीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी, प्रत्यक्षात पोलीस दलातील काही शुक्राचार्यांनी या संधीचाही लाभ घेतला आहे़
शुक्राचार्यांच्या या पथकाची विक्रेत्यांकडून वसुली सुरु आहे़ खुलेआम गुटखा विक्री करा आम्ही कारवाई करणार नाही, असे छातीठोक आश्वासनही त्यांच्याकडून दिले जात आहे़ त्यामुळे कारवाई एफडीएने केली असली तरी लाभ शुक्राचार्यांनाच होत असल्याचे दिसून येत आहे़
शहर व जिल्ह्यात शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुंगधी जर्दाची दररोज मोठ्या प्रमाणात आवक होते़ गुटखा विक्रीचे सर्वात मोठे केंद्र हे देगलूर नाका परिसरात आहे़ याच ठिकाणाहून शहर आणि जिल्ह्यात हा गुटखा पाठविला जातो़ याबाबत बराच बोभाटा झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाने पाच पानटपऱ्यांवर कारवाईचे सोपस्कार पूर्ण केले़
या पानटपरीचालकांवर कलम ३२८ या अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ त्यामुळे खळबळ उडाली आहे़ परंतु, गुटख्याचे माफिया असलेल्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही़ त्यानंतर एफडीने आपली मोहीम बंद केली़ असे असताना पोलीस दलातील शुक्राचार्यांचे एक पथक मात्र शहरातील गुटखा विक्री करणाºयांच्या दुकानावर परस्परच धाडी मारुन तपासणी करीत आहेत़ त्याचबरोबर आम्हाला खूश करा अन् खुशाल धंदा करा असा अफलातून सल्लाही दिला जात आहे़ शुक्राचार्यांच्या या पथकाचे नेतृत्व धान्य काळाबाजारात सहभागी असलेल्या अन् वरिष्ठांच्या खास मर्जीतील कर्मचा-याकडे सोपविण्यात आले आहे, हे विशेष़ शुक्राचार्यांनाही खूश करायचे अन् एफडीएची कारवाई झाल्यास कायदेशीर कचाट्यात अडकायचे, या दुहेरी कात्रीत विक्रेते सापडले आहेत़
दुकान तपासणीचे अधिकार दिले कुणी ?
खाकी वर्दीतील या कर्मचाºयांना गुटखाबंदीच्या कारवाईसाठी थेट दुकान तपासणीचे अधिकार दिले कुणी? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ विशेष म्हणजे, या कर्मचाºयाची नेमणूक बिलोली तालुक्यात आहे़ असे असताना बिनबोभाटपणे हा कर्मचारी जिल्हाभरात वसुलीसाठी फिरत आहे़

Web Title: Action FDA, the benefit of the spies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.