वाळूघाट सुरू होण्याच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:52 AM2019-05-06T00:52:58+5:302019-05-06T00:53:16+5:30
येथून जवळच असलेल्या माचनूर वाळू घाटावरून उपसा करण्याच्या प्रारंभाच्या दुसºयाच दिवशी म्हणजेच तीन मे रोजी दुपारच्या सुमारास बिलोली तहसील प्रशासनाच्या महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी-नागणी रोडवर माचनूर वाळू घाटावरून वाळू वाहून नेणारी तीन वाहने तपासली.
धर्माबाद : येथून जवळच असलेल्या माचनूर वाळू घाटावरून उपसा करण्याच्या प्रारंभाच्या दुसºयाच दिवशी म्हणजेच तीन मे रोजी दुपारच्या सुमारास बिलोली तहसील प्रशासनाच्या महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी-नागणी रोडवर माचनूर वाळू घाटावरून वाळू वाहून नेणारी तीन वाहने तपासली. त्यावेळी त्यांच्याकडील पावतीवरील इनवाईज नंबर नसल्याने सदरील तीन वाहने बिलोली तहसील प्रशासनाने जप्त करून ४ लाख ७५ हजार रुपयांचा दंड लावल्याची माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली.
२ मे रोजी देगलूर तालुक्यात प्रत्यक्ष जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ओव्हरलोड करणारी २७ वाहने पकडली़ माचनूर वाळूघाटाच्या वाळू उपशास २ मे पासून परवानगी दिली आहे. उत्खननाच्या दुसºयाच दिवशी बिलोली तहसीलचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी ते नागणी रोडवर माचनूर वाळूघाटावरून येणारी तीन वाहनांची तपासणी केली़
तपासणी केलेल्या वाहनांमध्ये ए.पी.१२ डब्ल्यू १४२८, टी.एस.टी. ४६५८, टी.एस.१६ यु.ए.२२१४ ही वाहने थांबवून पावत्या तपासल्या असता त्या पावतीवर इनवाईज नंबर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरील तीन वाहने तहसील प्रशासनाने जप्त करून त्यांना ४ लाख ७५ हजार रुपयांचा दंड लावला आहे. सलग दुसºया दिवशी कारवाई केल्यामुळे परिसरातील वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत़ परंतु, कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे़