कोरोनाच्या उपचारासाठी नांदेड जिल्ह्यात आणखी दोनशे खाटांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:16+5:302021-03-31T04:18:16+5:30

मंगळवारी डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या ...

Addition of 200 more beds in Nanded district for treatment of corona | कोरोनाच्या उपचारासाठी नांदेड जिल्ह्यात आणखी दोनशे खाटांची वाढ

कोरोनाच्या उपचारासाठी नांदेड जिल्ह्यात आणखी दोनशे खाटांची वाढ

Next

मंगळवारी डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सिरसीकर आदींची उपस्थिती होती.

कोरोनासदृश आजार असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांनी काळजी, स्वयंशिस्त व उपचार घेणे यातच सर्वांचे हित आहे. केवळ भीतीपोटी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे आग्रह धरला नाही तर स्वाभाविकच जे खरे गरजू आहेत त्या कोरोना रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा पोहोचविणे रुग्णालय व्यवस्थापनाला शक्य होईल, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपासून दिवसाला एक हजाराहून अधिक बाधित निघत असून बरे होऊन घरी जाणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. ज्यांना लक्षणे नाहीत व जे बाधित गोळ्या, औषधातून बरे होणारे आहेत अशा असिम्टोमॅटिक व्यक्तींसाठी आपण महसूल भवन आणि एनआरआय कोविड केअर सेंटर टप्प्या - टप्प्याने वाढवित आहोत. जिल्हा रुग्णालयात ६० ते ७० बेड्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ७० ते १२० बेड्स तर खासगी दवाखान्यात जवळपास २० ते ३० बेड्स वाढविले जात आहे. आरोग्यासाठी निधीची कमतरता नाही. जिल्ह्याला अतिरिक्त निधी कसा उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी दिली.

कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची टीम वर्षभर राबत आहे. प्रशासनाच्या या अखंड सुरु असलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला जनतेनेही आता सहकार्य वाढविले पाहिजे. भाजीपाला दारावर घेतला पाहिजे. बाहेर विनाकारण गर्दी करणे टाळले पाहिजे. लॉकडाऊन हा पर्याय नाही, यात ज्यांचे पोट हातावर आहे. त्याच्या रोजगाराची जाणीव आम्हाला आहे; मात्र जिल्ह्यातील आजची कोरोनाची स्थिती लक्षात घेता काही कठोर निर्णय घेणे जिल्हा प्रशासनाला कधी कधी क्रमप्राप्त ठरते असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Addition of 200 more beds in Nanded district for treatment of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.