नांदेडात पुरेशा खाटा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:18 AM2021-03-27T04:18:06+5:302021-03-27T04:18:06+5:30

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य विभागाकडून वेळोवेळी सर्व बाबींचा आढावा घेतला जात असून याला लागणारी पुरेशी व्यवस्था याबाबत नियोजन केले जात ...

Adequate bed available in Nanded | नांदेडात पुरेशा खाटा उपलब्ध

नांदेडात पुरेशा खाटा उपलब्ध

googlenewsNext

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य विभागाकडून वेळोवेळी सर्व बाबींचा आढावा घेतला जात असून याला लागणारी पुरेशी व्यवस्था याबाबत नियोजन केले जात आहे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी सिद्ध असून जनतेने आरोग्याची त्रिसूत्री काटेकोर पाळावी असे आवाहन त्यांनी केले.

बेडसंदर्भात अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पुरेशा बेडसह औषध व इतर उपचार साहित्याची नांदेड जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्धी आहे. मी स्वत: विविध हॉस्पिटलला जाऊन भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आलो आहे. काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून आवश्यकता नसतांना अनेकांनी दवाखान्यातील बेड अडवून ठेवले आहेत. केवळ भीतीपोटी जर कोणी हे कृत्य करत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही. मी अनावश्यक जे दवाखान्यात भरती झाले आहेत त्यांना घरी उपचार घेण्यास सांगून १० ते १२ व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देऊन आलो आहे. त्यांच्यावर सहजपणे घरी उपचार होणे शक्य असल्याची खातरजमा घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जनतेने आजार न लपविता सौम्य लक्षणे आढळली तरी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या. आवश्यकता असल्यास आपल्याला रूग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केले जातील. अनावश्यक काळजी करू नका. मात्र कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, इतरांपासून शारीरिक अंतर राखणे आणि सतत सॅनिटायजरचा वापर करणे यातच हित असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Adequate bed available in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.