आदिलाबाद-किनवट रेल्वेमार्ग उपेक्षितच, एकही नवीन गाडी धावेना?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 08:29 PM2024-08-14T20:29:59+5:302024-08-14T20:31:03+5:30

नांदेड, दिल्ली, श्रीगंगानगर ही किनवटमार्गे मंजूर रेल्वेगाडी हिंगोलीमार्गे वळवली तर मुंबई-काजीपेठ ही साप्ताहिक गाडी बंद करण्यात आली आहे.

Adilabad-Kinwat railway neglected, not a single new train running? | आदिलाबाद-किनवट रेल्वेमार्ग उपेक्षितच, एकही नवीन गाडी धावेना?

आदिलाबाद-किनवट रेल्वेमार्ग उपेक्षितच, एकही नवीन गाडी धावेना?

- गोकुळ भवरे

किनवट (जि.नांदेड) : आदिलाबाद-किनवट-मुदखेड-नांदेड या रेल्वेमार्गावर केवळ माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या कार्यकाळातच ज्या काही एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या, त्याच गाड्या धावत आहेत. नवीन एकही गाडी सुरू झाली नाही. उलट नांदेड, दिल्ली, श्रीगंगानगर ही किनवटमार्गे मंजूर रेल्वेगाडी हिंगोलीमार्गे वळवली तर मुंबई-काजीपेठ ही साप्ताहिक गाडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा लोहमार्ग उपेक्षितच राहिल्याचे किनवटकर बोलू लागले आहे.

२००४ ते २००९ सूर्यकांता पाटील यांच्या कार्यकाळात तब्बल २८ वर्षांनंतर आदिलाबाद, किनवट, मुदखेड या रेल्वे रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर २००९ ते २०१४ या कार्यकाळात माजी खासदार सुभाष वानखेडे हे खासदार होते. त्यांच्या काळात नांदेड, दिल्ली, श्रीगंगानगर ही साप्ताहिक गाडी किनवटमार्गे मंजूर झाली. पण, ती हिंगोलीमार्गे वळविण्यात आली. त्यांच्या काळात एकही गाडी सुरू झाली नाही.

२०१४ ते २०१९ हा काळ स्व. खासदार राजीव सातव यांचा त्यांच्याही खासदारकीच्या काळात एकपण गाडी सुरू झाली नाही. २०१९ ते २०२४ हा काळ माजी खासदार हेमंत पाटील यांचा ते तर सत्ताधारी खासदार होते, त्यांच्याही काळात एकही नवीन गाडी सुरू झाली नाही. उलट मुंबई-काजीपेठ ही साप्ताहिक गाडी बंद करण्यात आली आहे. आता २०२४-२०२९ हा खासदारकीचा काळ नागेश आष्टीकर यांचा असून, त्यांच्या काळात नवीन रेल्वेगाड्या सुरू होतील काय आणि रेल्वेविषयक प्रलंबित मागण्या मार्गी लागतील का? हे येणारा काळच सांगेल.

Web Title: Adilabad-Kinwat railway neglected, not a single new train running?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.