आदित्य ठाकरे आजपासून नांदेडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:37 AM2019-01-14T00:37:45+5:302019-01-14T00:38:14+5:30
शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार आहे़
नांदेड : शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाच्या दुसºया टप्प्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार असून यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत़ १५ जानेवारीपासून हा दौरा सुरु होणार असल्याची माहिती कोअर कमिटीचे सदस्य सिद्धेश कदम यांनी दिली़
पत्रपरिषदेत कदम म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने मदतीचा हात दिला जात आहे़ त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात आला़ आता १५ जानेवारीला आदित्य ठाकरे हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत़ सोमवारी दुपारी हदगाव तालुक्यातील वरवंट, दक्षिण मतदारसंघातील काकांडी, तुप्पा, १६ जानेवारीला उत्तर मतदारसंघातील खडकी, निळा, माळवट येथे चारा वाटप आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत़ त्या दिवशी ते नांदेड मुक्कामी असतील़ तर १७ जानेवारीला सकाळी १० वाजता पीपल्स हायस्कूलच्या मैदानावर सेल्फ डिफेन्स शिबिराचे उद्घाटन करणार आहेत़ त्यानंतर देगलूर विधानसभा मतदारसंघातील वन्नाळी व एकलारा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत़ प्राथमिक स्वरुपात तर त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात चारा वाटप होणार आहे़ नांदेड जिल्ह्यात एकूण २० ट्रक पशुखाद्याचे वाटप होणार आहे, असेही कदम म्हणाले़ यावेळी अमित गिते, इंगळे, गणेशराजे भोसले, दत्ता कोकाटे, आनंद बोंढारकर, जयवंतराव कदम, माधव पावडे, महेश खेडकर यांची उपस्थिती होती़