पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:27 AM2018-03-08T00:27:11+5:302018-03-08T00:28:17+5:30
येथील सर्वच शासकीय कार्यालयांत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात कर्मचारी व नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : येथील सर्वच शासकीय कार्यालयांत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात कर्मचारी व नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे.
धर्माबाद उपविभागीय कार्यालय, तहसील, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय इ. महत्त्वांची कार्यालये असून दिवसभर या कार्यालयांत विविध कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र कार्यालयात आल्यानंतर पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यातून कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही सुटत नाहीत. एकूणच सर्वच कार्यालयांत पाण्याची सोय केली नसल्याचे दिसते.
धर्माबाद उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय व भूमिअभिलेख कार्यालय शहराच्या बाहेर असून या कार्यालयात पाणी तर सोडा; साधा माठही नाही. काही कर्मचारी स्वत:च पाण्याची बाटली भरुन आणतात. कार्यालयात दिवसभर बसावे लागत असल्याने सहसा एक कर्मचारी दुसºयाला पाणीही देत नाही. कार्यालयाच्या जवळपास हॉटेलचीही सोय नाही. सोबतचे पाणी संपल्यानंतर कर्मचाºयांना गावात येऊन पाणी घेऊन पुन्हा कार्यालयात जावे लागते, असे चित्र आहे. कामासाठी येणाºया नागरिकांनाही असेच करावे लागते. संबंधितांनी लक्ष देऊन पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.