६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:08+5:302020-12-23T04:15:08+5:30
तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिघुल वाजताच पुर्व तयारीत असणा-या गाव पुढाऱ्यांनी घरोघर भेट देत असुन गल्ली-बोळात ...
तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिघुल वाजताच पुर्व तयारीत असणा-या गाव पुढाऱ्यांनी घरोघर भेट देत असुन गल्ली-बोळात निवडणुकीच्या चर्चा मध्यराञीपर्यंत चांगल्याच रंगु लागल्या आहेत.राज्य निवडणुक आयोगाने मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आलेल्या तालुक्यातील ६४ ग्राम पंचायतीचा निवडणुक कार्यक्रम नुकताच जाहीर केला असुन ग्रामपंचायतीची आचारसंहीता लागु करण्यात आली आहे.तर दुसरी निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असुन गुडघ्याला बाशिंग बांधुन निवडणुक लढविणा-या इच्छूकांनी मोर्चेबांधणी, कागदपञांची जुळवा-जुवळ करण्यास सुरुवात केली. २३ डिसेंबरपासुन नामनिर्देशनपञ दाखल करणे सुरु होणार असल्याने तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी निवडणुक निर्णय व सहाय्यक अधिका-यांच्या बैठका घेऊन त्यांना माहीती व सुचना दिल्या आहेत.तहसिलच्या आंतर प्रांगणात उमेदवारांकरीता आसन व्यवस्था,जाळ्या,प्रतिबंधित क्षेञ आदींची बांधणी केली करुन घेतली आहे. निवडणुक प्रक्रीयेच्या यशस्वीतेसाठी निवडणुकीचे रघुनाथसिंग चौव्हाण, डॉ.ओमप्रकाश गोंड, अरशद शेख, साई कुडकेकर यांच्यासह महसुल, तहसिल प्रशासनाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.