कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:51+5:302021-06-30T04:12:51+5:30
माहूर येथील नगरपंचायत आरोग्य विभाग व पोलीस विभाग यांचे संयुक्त पथक मुख्याधिकारी विद्या कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, ...
माहूर येथील नगरपंचायत आरोग्य विभाग व पोलीस विभाग यांचे संयुक्त पथक मुख्याधिकारी विद्या कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव भिसे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २१ जून रोजी आरटीपीसीआर ६२, अँटिजन ३२, तर २२ जून रोजी आरटीपीसीआर ६३, अँटिजन ३० व २३ रोजी आरटीपीसीआर ५८ आणि अँटिजन ३१ तपासण्या झाल्या आहेत. तीन दिवसांत २७६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, दररोज सकाळी ९ ते १२ पर्यंत तपासण्या करण्यात येत आहेत. या तपासणी पथकात नगरपंचायतचे कर निरीक्षक गंगाधर दळवी, प्रयोगशाळा अधिकारी रितेश कुमरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रल्हाद सोनटक्के, आरोग्य कर्मचारी शिवाजी सोळुंके, अश्विन राठोड, विनोद जाधव, सुनील राठोड, होमगार्ड उमेश भगत, आनंदगीर गिरी, दत्ता राठोड, गणेश शेवाळे, आशिष आडे यांचा समावेश आहे.