तब्बल २४ वर्षाच्या खंडानंतर भीमराव केरामांच्या गळ्यात आमदारकीची माळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 01:00 PM2019-10-26T13:00:18+5:302019-10-26T13:02:43+5:30

भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९३ मध्ये होते आमदार

After 24 years of fragmentation, Bhimarao Kerama became MLA frm Kinwat | तब्बल २४ वर्षाच्या खंडानंतर भीमराव केरामांच्या गळ्यात आमदारकीची माळ 

तब्बल २४ वर्षाच्या खंडानंतर भीमराव केरामांच्या गळ्यात आमदारकीची माळ 

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या प्रदीप नाईकांना कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका वंचितच्या उमेदवाराचाही झटका

किनवट : भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९३ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले भीमराव केराम यांच्या गळ्यात तब्बल २४ वर्षानंतर पुन्हा आमदारकीची माळ पडली आहे़ दुसरीकडे, राष्ट्रवादीचे उमेदवार तथा आमदार प्रदीप नाईक यांना काही कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बसला़ वंचित आघाडीचे डॉ़ हमराज उईके यांची उमेदवारीही नाईक यांना भोवली़

भाजपाने ऐनवेळी भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर करून इच्छुकांच्या तयारीवर पाणी फेरले होते़ इच्छुक केराम यांचा प्रचार करतील की नाही, असे वातावरण असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या किनवट येथे झालेल्या सभेनंतर महायुतीच्या सर्वच असंतुष्टांनी केराम यांचा इमानेइतबारे प्रचार केला़ मु्ख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सर्वांचे मनोमिलन झाले़ प्रदीप नाईक विरूद्ध इतर सर्व अशी लढत चर्चेला आली़ झालेही तसेच़ पद नसतानाही तळागाळातील लोकांच्या समस्यांसाठी झगडणारे भीमराव केराम लोकांच्या चांगलेच नजरेत राहिले़ मतदारांनी केराम यांना उत्स्फूर्तपणे मतदान केले़

दुसरीकडे अनेक कार्यकर्ते नाईकांच्या भरवशावर गुत्तेदार म्हणून मोठे झाले़ अशापैकी काहींनी दगा दिला़ काही लोकप्रतिनिधींना आपले गट व गण शाबूत ठेवता आले नाहीत़ मित्रपक्ष काँग्रेसचे कार्यकर्तेही प्रचारापासून चार हात दूर राहिले़ ही बाबही नाईक यांना भोवली़ आमदार चांगला, कार्यकर्ते बरोबर नाहीत ही लोकांची भूमिकाही नाईकांना भोवली़ 

भीमराव केराम यांना मिळालेली मते : 88,881
    पराभूत उमेदवार    पक्ष    मिळालेली मते
२    जाधव प्रदीप नाईक    राष्ट्रवादी काँग्रेस    ७५,१३८
३    विनोद राठोड    मनसे    ९८९
४    संदीपभाऊ निखाते    बहुजन समाज पार्टी    ३३९
५    अडकिणे संतोष माधव    बहुजन मुक्ती पार्टी    ३८८
६    मिरची महाराज धर्मादास त्रिपाठी    जयजवान पार्टी    ३१२
७    विशाल दत्ता शिंदे    संभाजी ब्रिगेड पार्टी    ३१४
८    शादुल्ला शेख अहमद    बळीराजा पार्टी    २८५
९    प्रो़डॉ़हमराज उईके    वंचित बहुजन आ़    ११,५८०
१०    अ‍ॅड़प्रदीप देवा राठोड    अपक्ष    ७८९


विजयाची तीन कारणे...
1संघ परिवार, भाजपा, शिवसेना व भीमराव केराम यांच्या चाहत्यांनी नियोजनबद्ध प्रचार केला़ हिंदुत्ववादी मते खेचण्यात केराम यांना यश आले़ 
2वंचितचे हेमराज उईके यांची उमेदवारीही केराम यांच्या विजयाला हातभार लावून गेली़ 
3माहूर व किनवट तालुक्यातील मतदारांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबद्दल असलेली नाराजी प्रदीप नाईक यांना भोवली़ त्यामुळेच १५ वर्षानंतर किनवट मतदारसंघात कमळ फुलले़ 

Web Title: After 24 years of fragmentation, Bhimarao Kerama became MLA frm Kinwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.