अखेर ‘सोहेल’ काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:25 AM2018-03-15T00:25:41+5:302018-03-15T00:25:56+5:30

जुन्या नांदेडातील होळी प्रभागात पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येणारे पाईप हे चोरीचेच असल्याचे महापालिकेच्याही चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सलग महापालिकेने कारवाईचा बडगा उगारताना सदर कंत्राटदाराकडून हे काम काढून घेत त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

After all, 'Sohail' is in the black list | अखेर ‘सोहेल’ काळ्या यादीत

अखेर ‘सोहेल’ काळ्या यादीत

googlenewsNext
ठळक मुद्देपाईप चोरी प्रकरण : ठेकेदाराने कामासाठी वापरलेले पाईप चोरीचेच

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जुन्या नांदेडातील होळी प्रभागात पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येणारे पाईप हे चोरीचेच असल्याचे महापालिकेच्याही चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सलग महापालिकेने कारवाईचा बडगा उगारताना सदर कंत्राटदाराकडून हे काम काढून घेत त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
प्रभाग १४ मधील पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात होते. पोलिसांनी संशयावरुन ते जप्त केले. त्यानंतर महापालिकेने हे काम करणाऱ्या सोहेल कन्स्ट्रक्शनला नोटीस बजावली होती. ही नोटीस मिळताच सोहेल कन्स्ट्रक्शनने मंगळवारी खुलासा आणि पाईप खरेदीचे देयक सादर केले होते.
या देयकाची महापालिकेच्या पथकाने चौकशी केली. उपायुक्त रत्नाकर वाघमारे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी ही तपासणी केली. या तपासणीत सदर कंत्राटदाराने सादर केलेल्या देयकाप्रमाणे ५२ पाईप घटनास्थळी आढळल्याचे सांगण्यात आले; पण त्याचवेळी या कामावर चोरीचे पाईपही मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्याचे मंगळवारी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर काम करणाºया सोहेल कन्स्ट्रक्शनकडून हे काम तात्काळ काढून घेण्यात आले. तसेच सोहेल कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे.
आगामी काळात सोहेलला महापालिकेचे कोणतेही काम दिले जाणार नाही. पाईप चोरी प्रकरणाचा न्यायनिवाडा होईपर्यंत सदर कंत्राटदार काळ्या यादीत राहील, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. सोहेल या कामाचे कोणतेही देयक दिले जाणार नाही. इतकेच नव्हे, तर भविष्यातही ते देऊ नये असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सोहेलची ४५ हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, होळी प्रभागातील दलित वस्ती निधीतून पाणीपुरवठा कामाची तात्काळ निविदा काढण्यात येणार आहे. हे काम त्वरित करुन या भागातील नागरिकांची तहान भागविली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. फेरनिविदेचा जो खर्च येईल तो आणि सद्य:स्थितीतील निविदा दरापेक्षा जादा दर आल्यास तो जादा दर सोहेलकडून वसूल केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा अधिकाºयांना अभय
महापालिकेच्या कामावर चक्क तेलंगणा तसेच कर्नाटक राज्यातून चोरुन आणलेले पाईप वापरले जात होते. इतवारा पोलिसांनी हा प्रकार उघड केल्यानंतर महापालिका जागी झाली. त्यानंतरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे कारण देत कारवाई केली जात नव्हती. सदर साईटवर होणारे काम पाहण्याची जबाबदारी असलेले उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांना ही बाब कशी लक्षात आली नाही, हेही अनाकलनीय आहे. या ठिकाणी पाईप टाकण्यात आले. इतकेच नव्हे, तर १४ मार्च रोजी सदर ठिकाणाहून टाकलेले पाईप काढूृन नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो यशस्वी झाला नाही. केवळ देयक दिले नाही असे कारण देत अधिकाºयांना अभय देण्याचा प्रकार म्हणजे आगामी काळातही अशा प्रकरणांना चालना देणाराच ठरणार आहे.
ठेकेदाराकडून पाईप बदलण्याचा प्रयत्न
होळी प्रभागातील सिद्धार्थनगरमध्ये सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी टाकलेले पाईप बुधवारी पहाटेपासूनच बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठेकेदाराने जमिनीत टाकलेले पाईप उकरुन काढले. हे पाईप बदलण्याचा खटाटोप ऐनवेळी करण्यात येत होता. घाईघाईने सुरु असलेले हे काम पाहता स्थानिकांना संशय आला. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्तेही तेथे पोहोचले. त्यामुळे काढलेले पाईप तेथेच ठेवून ठेकेदाराच्या मजुरांनी पळ काढला. या प्रकरणी मात्र महापालिका अथवा पोलिसांनी कारवाई केली नाही.

Web Title: After all, 'Sohail' is in the black list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.