'बीआरएस'नंतर आणखी एका नव्या राजकीय पक्षाची महाराष्ट्रात एंट्री

By प्रसाद आर्वीकर | Published: April 5, 2023 05:25 PM2023-04-05T17:25:43+5:302023-04-05T17:26:41+5:30

नऊ एप्रिल रोजी तपस्वी योगानंद महाराज यांच्या हस्ते पक्षाचे लोकार्पण होणार

After 'BRS', another new political party has entered Maharashtra | 'बीआरएस'नंतर आणखी एका नव्या राजकीय पक्षाची महाराष्ट्रात एंट्री

'बीआरएस'नंतर आणखी एका नव्या राजकीय पक्षाची महाराष्ट्रात एंट्री

googlenewsNext

नांदेड : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षानंतर आता समनक जनता पार्टी हा नवीन राजकीय पक्ष जिल्ह्यात दाखल होत असून, ९ एप्रिल रोजी माहूरगड येथे पक्षाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संपत चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिली.

देशातील साधन संपत्तीचे संविधानानुसार समान वाटप व्हावे या प्रमुख उद्देशाने समनक जनता पार्टीची स्थापना झाली आहे. सद्यस्थितीला सत्तेचे केंद्रीकरण झाले असून, १० ते १५ टक्के लोकांकडेच सत्ता सुत्रे आहेत. त्यामुळे भांडवलदारी वाढत असून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत आहे. संविधानाने प्रस्थापित केलेली लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष काम करणार असल्याचे प्रा संपत चव्हाण यांनी सांगितले. या प्रसंगी प्रा.अनिल राठोड यांनी पक्षाची भूमिका मांडली. 

२४ सामाजिक संघटना आणि छोटे राजकीय पक्षासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. असून नऊ एप्रिल रोजी तपस्वी योगानंद महाराज यांच्या हस्ते पक्षाचे लोकार्पण होणार असून, महाराष्ट्र विकास आघाडीचे अण्णाराव पाटील, रामकृष्ण कालापाड, अमरसिंग तिलावत, शब्बीर भाई अन्सारी, शंकर पवार, डॉ.शिवाजी खंदारे, कल्याण दळे, दशरथ राऊत, दिनकर वाघमारे, नंदेश आंबेडकर, सतीश कसबे, उमेश कोराम, मंगेश सोळंके, सुनील गोटखिंडे, आत्माराम जाधव, कांतीलाल नाईक, मोरसिंग राठोड, रुबीना पटेल, रविकांत राठोड, उल्हास राठोड आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Web Title: After 'BRS', another new political party has entered Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.