कोरोनानंतर शिक्षणक्षेत्रात नवीन ज्ञानयज्ञ सुरू होईल - गोविंद नांदेडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:18+5:302021-06-16T04:25:18+5:30
संस्कारभारती नांदेड आयोजित कोरोणा जनजागृती अभियानातील चतुर्थ पुष्पाची सांगता रविवारी, (दि. १३ जून)ला झूम आभासी सभागृह व फेसबुक लाईव्हवर ...
संस्कारभारती नांदेड आयोजित कोरोणा जनजागृती अभियानातील चतुर्थ पुष्पाची सांगता रविवारी, (दि. १३ जून)ला झूम आभासी सभागृह व फेसबुक लाईव्हवर संपन्न झाली. शिक्षणावर झालेला कोरोनाचा दुष्परिणाम व उपाययोजना यासाठी सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सभागृहामध्ये प्रांत पदाधिकारी भगवानराव देशमुख, प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, डॉ. जगदीश देशमुख, नांदेड समितीचे डॉ. प्रमोद देशपांडे, अंजली देशमुख, अनिल पांपटवार, राजीव देशपांडे, विश्वास अंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आज मराठवाड्यात २७ लाख प्राथमिक, १६ लाख माध्यमिक व ९ लाख कॉलेज विद्यार्थी आहेत. त्यापैकी फार कमी टक्के विद्यार्थी आभासी शिक्षण घेत आहेत. शिक्षणक्षेत्राचे असे नुकसान परवडणार नाही. विनाश तात्पुरता असतो पण विकास चिरकालीन असतो. आव्हान केले की सामर्थ्याची ऊर्मी येते. शिक्षक-विद्यार्थी, पालक-विद्यार्थी ह्यांच्या अंतर्क्रियेने विद्यार्थी सक्षम होतो. त्यामुळे येत्या तीन ते चार महिन्यांत सर्व चित्र पालटेल व शिक्षणक्षेत्र पूर्वपदावर येईल, असा विश्वास डॉ. नांदेडे यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोप संस्कारभारती नांदेडचे अध्यक्ष दि. मा. देशमुख यांनी केला. प्रारंभी पूजा देशपांडेने संस्कार भारती ध्येयगीत सादर केले. कार्यक्रमाचे नेटके प्रास्ताविक व सूत्रसंचालन राधिका वाळवेकर यांनी केले. डॉ. नांदेडे यांचा कार्यपरिचय डॉ. दीपक कासराळीकर यांनी करून दिला. संघटक जयंत वाकोडकर यांनी आभार मानले.