भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर भूगर्भातील हालचालींवर वैज्ञानिकांची राहणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 03:19 PM2019-06-27T15:19:41+5:302019-06-27T15:25:29+5:30

भारतीय भू-वैज्ञानिक सर्व्हेक्षण विभाग नागपूरचे भूगर्भ शास्त्रज्ञ यांनी गुरुवारी किनवट तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या़ 

After the mild tremor of the earthquake, scientists watch remains on the earthquake movements at Nanded | भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर भूगर्भातील हालचालींवर वैज्ञानिकांची राहणार नजर

भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर भूगर्भातील हालचालींवर वैज्ञानिकांची राहणार नजर

Next
ठळक मुद्देगोकुंदा, भूलजा व दराटी येथे बसविली यंत्रणाभूकंपाचा केंद्रबिंदू किनवटपासून ५० कि़मी़ अंतरावर

- गोकुळ भवरे

किनवट (नांदेड ) : यवतमाळ जिल्ह्यासह नांदेडमधील किनवट, माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, भोकर, मुदखेड तालुक्याला २१ जून रोजी भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता़ या धक्क्यानंतर या परिसरात अजूनही घबराटीचे वातावरण आहे़ दरम्यान, या भागात झालेल्या भूकंपाच्या अनुषंगाने नागपूर येथील भूगर्भ शास्त्रज्ञ किनवट तालुक्यात आले असून तालुक्यातील गोकुंदा, भूलजासह यवतमाळ जिल्ह्यातील दराटी येथे भूगर्भातील हालचालींची नोंद घेणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे़  

२१ जूनच्या रात्री ९.१२ वाजता किनवट, माहूर तालुक्यासह हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, भोकर, मुदखेडसह विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात काही भागात भूकंपाच्या सौम्य धक्क्याची नोंद झाली होतीे़ या भूकंपाचा केंद्रबिंदू किनवटपासून ५० कि़मी़ अंतरावर असलेल्या तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात असल्याचे समोर आले होते़ या अनुषंगाने भारतीय भू-वैज्ञानिक सर्व्हेक्षण विभाग नागपूरचे भूगर्भ शास्त्रज्ञ यांनी गुरुवारी किनवट तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या़ 

२१ जून रोजी जमिनीतून अचानक गडगड असा आवाज येत हादरा बसला़ यामुळे काही घरातील भांडी पडली तर काही घरांच्या भिंतीला किरकोळ तडे गेले़ या धक्क्याची भूकंप मापक केंद्रावर ३.९ रिष्टर स्केलची इतकी नोंद झाली होती़ या अनुषंगाने जमिनीच्या खाली काय हालचाली होत आहेत याबाबतची माहिती मिळवण्यासाठी विदर्भातील दराटी व किनवट तालुक्यातील गोकुंदा, भुलजा या तीन ठिकाणी यंत्रणा बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ 

गोदावरी नदीची उपनदी कडम आहे़ याच ठिकाणी भूगर्भात हालचाली होत आहेत़ तेथील दगड कमजोर आहे़ कडम फाल्टमुळे २१ रोजी उत्तर पूर्व, दक्षिण पश्चिमी भूकंपाचा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले़ भूगर्भात अशा पद्धतीच्या हालचाली नेहमी सुरू असतात़ त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही़  किनवट व परिसरातील अन्य भाग भूकंपप्रवण क्षेत्र नाही़ सदर भूकंपाचा धक्का केवळ कडम फाल्टमध्ये झालेल्या हालचालीमुळे जाणवला असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूपेश कुरकुडे आणि भूभौतिमी वैज्ञानिक अक्षय जोशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़ यावेळी त्यांच्यासोबत आरक़े़ठाकरे हे वैज्ञानिकही होते़ तीन जणांची ही टीम आठवडाभर किनवटसह माहूर, उमरखेड, हिमायतनगर आदी भागात भेटी देऊन पाहणी करणार आहेत़ तसेच भूगर्भाखालील हालचालींची नोंद घेणार आहेत़  दराटी, गोकुंदा व भुलजा येथे बसविलेली यंत्रणा जमिनीखाली काही हालचाली झाल्यास त्याची संगणकावर माहिती देत राहील, असेही भूपेश कुरकुडे यांनी सांगितले़

Web Title: After the mild tremor of the earthquake, scientists watch remains on the earthquake movements at Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.