Video: आता बोला! भीषण अपघातानंतर द्राक्ष, ऊस पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 05:51 PM2024-03-08T17:51:49+5:302024-03-08T17:54:00+5:30

काहींनी तर फोन करून मित्र, नातेवाईकांना फुकटचे द्राक्ष, ऊस नेण्याचे आमंत्रण दिले. 

After the terrible accident, the citizens made huge runs for stole grapes and sugarcane | Video: आता बोला! भीषण अपघातानंतर द्राक्ष, ऊस पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड

Video: आता बोला! भीषण अपघातानंतर द्राक्ष, ऊस पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड

- सुनील चौरे

हदगाव: आज भल्या पहाटे नांदेड- नागपूर महामार्गावर कौठा शिवारात एका द्राक्ष वाहतूक करणाऱ्या ट्रक व ऊसाचा ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. यात दोघे चालक बचावले पण नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनातून द्राक्षाचे कॅरेट अन् ऊसाच्या मोळ्या पळवल्या. 

नाशिकवरुन द्राक्ष घेऊन एक ट्रक नागपूरकडे जात होता. तर ऊसाचा ट्रॅक्टर साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान, आज पहाटे कौठा शिवारातील गजानन मंदीसमोर भिषण अपघात झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण ट्रकमधील द्राक्षांचा रस्त्यावर सडा पडला. ही घटना समजताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. काहींनी थेट द्राक्षाचे कॅरेट पळवले तर काहींनी थेट पिशव्या भरून द्राक्ष घरी नेले. फुटकचे द्राक्ष, ऊसाच्या मोळ्या नेट असताना अनेकांची दमक्षाक झाली. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. काहीवेळाने पोलिसांनी अपघातस्थळी येत वाहतूक सुरळीत केली.

मित्र नातेवाईकांना फोन करून बोलावले 
द्राक्ष अन् उसाचा रस्त्यावर सडा पडल्याची माहिती मिळताच अनेकांनी धाव घेत द्राक्षाचे कॅरेट पळवले. कोणी पिशव्या भरून द्राक्ष अन् खांद्यावर उसाच्या मोळ्या नेल्या. तर एवढ्यावरच न थांबता काहींनी फोन करून मित्र, नातेवाईकांना फुकटचे द्राक्ष, ऊस नेण्याचे आमंत्रण दिले. 

Web Title: After the terrible accident, the citizens made huge runs for stole grapes and sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.