मजुरांअभावी शेती आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:40 AM2019-02-24T00:40:53+5:302019-02-24T00:41:22+5:30

मजुरांची चणचण भासत असल्याने शेतीतील कामे थांबली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणी करावी लागते़

Agriculture due to laborers was in danger | मजुरांअभावी शेती आली धोक्यात

मजुरांअभावी शेती आली धोक्यात

Next
ठळक मुद्देशेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल

अर्धापूर/ पार्डी : मजुरांची चणचण भासत असल्याने शेतीतील कामे थांबली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणी करावी लागते़ तसेच पिकांची कापणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे़ यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना अच्छे दिन आले आहेत़
अर्धापूर तालुक्यात गतवर्षात पावसाळा सरासरीपेक्षा कमी झाल्याने नदी, नाले, बोअर व विहीर थोड्याफार प्रमाणात पाण्याने भरले होते व इसापूर धरणातून पाच पाणीपाळ्या मिळत असल्याने शेतकºयांनी केळी पिकाला बगल देऊन हळद, ऊस, हरभरा, गहू व ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती़ तसेच या पिकासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने ही पिके जोमात आली़ यामधील हळद, हरभरा व गहू पिके फेब्रुवारी महिन्यात काढणीस आली़
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतीतील कामे लवकर करण्यासाठी मजुरांची मनधरणी करावी लागत आहे़ अर्धापूर तालुक्यात निमगाव, चोरंबा, कारवाडी, देळूब, शेणी, पार्डी, लहान, लोण या परिसरात हळद, गहू व हरभरा हे पिके जास्त मुबलक प्रमाणात आले आहेत़ त्यासाठी मजूरदार जास्त लागत आहेत़ पण ग्रामीण भागात कामगार वर्गाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीतील कामात अनेक अडचणी निर्माण होत आहेत़ प्रामुख्याने शेती कामासाठी महिला वर्गाची आवश्यकता असते़ परंतु कालांतराने महिला मजुरांची कमी-कमी होत आहेत़ ग्रामीण भागातील महिला पुरुषाच्या खाद्यास खांदा लावून शिक्षणाच्या प्रवाहात जात आहे़ ग्रामीण भागातील महिला शिक्षण घेऊन लहान मोठे व्यवसाय करीत आहेत़ तसेच शिक्षण घेऊन नोकरीत आहेत़ यामुळे ग्रामीण भागात महिला मजूर मिळणे अशक्य झाले आहे़
सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकºयांनी मजुरांची मजुरी वाढवली आहे़ महिला मजुरांना १०० ते १५० रुपये दिले जात आहे़ तर पुरुषांच्या मजुरीतसुद्धा वाढ झाली आहे़ पुरुष मजुरांना २०० ते २५० रुपये मजुरी देण्यात येत आहे़ गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात मजुरीत वाढ झाली आहे़ तरी पण मजुरांची कमतरता भासत आहे़ हळद काढणीसाठी १५ ते २० मजूर लागतात व मजुरांना १० ते १५ दिवस अगोदर सांगावे लागत आहे़ तरीसुद्धा कामगार निळत नसल्याचे चित्र दिसत आहे़

Web Title: Agriculture due to laborers was in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.