अर्धापूर आरोग्य केंद्रात ३०० व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:55+5:302021-05-07T04:18:55+5:30

ऑनलाईन नोंदीनुसार या केंद्रावर कोविशिल्ड लस दिली जात आहे. ऑनलाईन अर्ज करताना नागरिकांनी लस घेण्याची वेळ निश्चित केली, त्या ...

Aim to vaccinate 300 persons at Ardhapur Health Center | अर्धापूर आरोग्य केंद्रात ३०० व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

अर्धापूर आरोग्य केंद्रात ३०० व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

Next

ऑनलाईन नोंदीनुसार या केंद्रावर कोविशिल्ड लस दिली जात आहे. ऑनलाईन अर्ज करताना नागरिकांनी लस घेण्याची वेळ निश्चित केली, त्या वेळेनुसार नागरिक लस घेण्यात येत आहेत. त्यामुळे लसीकरण करणे सोयीचे होत असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. शिंदे यांनी दिली आहे. ऑनलाईन नोंदीनुसार ९० ते ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण होत आहे. या केंद्रात १ मे रोजी ८०, २ मे- २६७, ३ मे- २५५, ४ मे- २७४, ५ मे- ३०९ तर आज ६ मे रोजी ३७६ लाभार्थ्यांना कोविशिल्डचा डोस देण्यात आला. दरम्यान ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तीही या केंद्रावर लस घेण्यात येत आहेत.

या लसीकरणाच्या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. शिंदे यांच्यासह डॉ. शुभांगी सोनटक्के, डॉ. विद्या पाटील, डॉ. सय्यदराज व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी पुढाकार घेत आहेत. तहसीलदार सुजीत नरहरे, गटविकास अधिकारी मीना रावताळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिणे, यांच्या मार्गदर्शनात कोविड लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Aim to vaccinate 300 persons at Ardhapur Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.