अजंठा एक्स्प्रेस सिकंदराबाद ऐवजी काचीगुडा येथून सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:43+5:302021-03-16T04:18:43+5:30
नांदेड - सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर स्वयंचलित कोच वाॅश प्लांटची सुविधा सुरु करण्याकरिता शंटिंग मार्गावर आठ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला ...
नांदेड - सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर स्वयंचलित कोच वाॅश प्लांटची सुविधा सुरु करण्याकरिता शंटिंग मार्गावर आठ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे गाडी संख्या ०७०६३ मनमाड-सिकंदराबाद-मनमाड अजंठा एक्स्प्रेस ही दिनांक १६ ते २३ मार्च दरम्यान सिकंदराबाद ऐवजी काचीगुडा रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. तर गाडी संख्या ०७०६४ सिकंदराबाद ते मनमाड अजंठा एक्स्प्रेस ही दिनांक १७ ते २४ मार्च दरम्यान सिकंदराबाद ऐवजी काचीगुडा रेल्वे स्थानकावरून सुटेल. याबरोबरच पूर्णा ते नांदेड दरम्यान काही रेल्वे फाटकांवर भुयारी पूल बनविण्याकरिता आर. सी. सी. बॉक्सेस टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवार, १६ मार्च रोजी गाडी संख्या ०७६६५ परभणी - नांदेड ही विशेष गाडी पूर्णा ते परभणी दरम्यान १३५ मिनिटे उशिराने धावणार असल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.