सर्व परीक्षा अनियमित काळासाठी पुढे ढकला, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:18+5:302021-04-05T04:16:18+5:30

संपूर्ण राज्यामध्ये हजारोंच्या संख्येने कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात रोज वीस-बावीस रुग्णांचा मृत्यू होत आहे. ...

All examinations postponed indefinitely, demanded the Nationalist Students Congress | सर्व परीक्षा अनियमित काळासाठी पुढे ढकला, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

सर्व परीक्षा अनियमित काळासाठी पुढे ढकला, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

Next

संपूर्ण राज्यामध्ये हजारोंच्या संख्येने कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात रोज वीस-बावीस रुग्णांचा मृत्यू होत आहे. बरेचसे प्राध्यापकसुद्धा कोरोना संक्रमित झालेले आढळून येत आहेत. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये कोरोनापासून बचाव होण्यासाठी अशी कोणतीही व्यवस्था आढळून येत नाही. अशा भयानक परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे विद्यार्थी व प्राध्यापकांच्या जिवाशी खेळण्यासारखे होईल. कोरोनाच्या संक्रमणाच्या वाढत असलेल्या परिस्थितीमध्ये योग्य त्या सुधारणा झाल्यानंतर या परीक्षा घेण्यात याव्यात. ६ एप्रिलपासून होणाऱ्या सर्व परीक्षा या अनियमित काळासाठी पुढे ढकलण्यात याव्यात. विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षा घेण्याचे धाडस केले, तर जर कोणी प्राध्यापक व विद्यार्थी कोरोना संक्रमित झाला व तसे त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाले त्याची विद्यापीठ प्रशासन जबाबदारी घेणार का? असा प्रश्नदेखील निवेदनाद्वारे विचारण्यात आला.

Web Title: All examinations postponed indefinitely, demanded the Nationalist Students Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.