पीक कर्ज वेळेत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:37+5:302020-12-07T04:12:37+5:30
निसर्गाचा समतोल बिघडल्याने गेल्या चार वर्षांपासून सततची नापिकी व कर्जबाजारीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ...
निसर्गाचा समतोल बिघडल्याने गेल्या चार वर्षांपासून सततची नापिकी व कर्जबाजारीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत सर्वात मोठी कर्जमाफी देऊन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलासा दिला होता. ऐन पेरणी काळात स्टेट बँक आँफ इंडिया मुक्रमाबादमधील सर्व कर्जमाफी झालेल्या १,४०० शेतकऱ्यांना व इतर १०१ सह पंधराशे शेतकऱ्यांना नव्याने वेळेत ९ करोड १५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
आणखी ३५० शेतकऱ्यांचे पीककर्जाचे नवीन प्रस्ताव मुख्य ब्रँच नांदेड येथे प्रलंबित आहेत. मंजुरी येताच त्यांनासुद्धा तात्काळ पीककर्ज शाखेकडून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शाखा प्रबंधक नवीन प्रजापती यांनी दिली आहे. कोरोना महामारीचे संकट असतानाही आपल्या जिवाची पर्वा न करता शाखेकडून वेळेत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप कॅन उद्दिष्ट पूर्ण केले आहे. याकामी महेश नाईक, लोकेश कोकडे, विजय शाहू, अंकुश मंदे, उमाकांत जावळे, प्रकाश घंटेलवाड, राजू गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
श्वान आरोग्य शिबिर संपन्न
हदगाव : हदगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊनगर येथे ६ डिसें. रोजी श्वान आरोग्य शिबिर पार पडले. यावेळी तामसा, हदगाव, उमरखेड, निवघा, हडसानी, अंबाळा व आजूबाजूच्या अनेक ठिकाणांहून श्वान शिबिरासाठी मालकाच्या वतीने आणण्यात आले होते. या श्वान आरोग्य शिबिरात एकूण ५० श्वानांचा सहभाग नोंदवला गेला. यावेळी येथील डॉ. लाड यांनी ‘अँटिरेबिज’ व ‘सेव्हन इन वन’ या लसीविषयी अधिक माहिती दिली. सर्व श्वानांना जंतुनाशक औषधी दर तीन महिन्यांनी देणे आवश्यक आहे; अन्यथा त्याच्या आरोग्याची वाढ होत नसल्याचे डॉ. लाड यांनी सांगितले. आरोग्य शिबिर सहभागात डॉ. लाड, डॉ. संतोष कांबळे, ड्रेसर शंकर व शिबिर यशस्वीतेसाठी सुमित महाजन, संदीप महाजन, श्याम लवांडे, नीलेश येमेवार आदी मान्यवरांनी सहकार्य केले.