नांदेड शहरात आज आंबेडकरी विचारवेध संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:39 AM2017-12-17T00:39:13+5:302017-12-17T00:39:25+5:30
नांदेड : शहरात १७ डिसेंबर रोजी अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेच्यावतीने आयोजित पहिले आंबेडकरी विचारवेध संमेलन होत आहे. आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरात १७ डिसेंबर रोजी अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेच्यावतीने आयोजित पहिले आंबेडकरी विचारवेध संमेलन होत आहे. आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणाºया या संमेलनात आंबेडकरवादाला अभिप्रेत असलेले पर्यायी जग या विषयावर डॉ. अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विचारवेध परिसंवाद होईल. यामध्ये डॉ. वंदना महाजन व सुभाष थोरात विचार मांडणार आहेत. विचारवेध संमेलन परिसराला पत्रकार गौरी लंकेश यांचे नाव देण्यात आले आहे तर विचारमंचाला रमाई विचारमंच असे नाव देण्यात आले. दुपारी दीड वाजता प्रा. सत्यश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया सत्रात समाजवाद, सेक्यूलॅरिझम आणि आंबेडकरवाद या विषयावर अन्वर राजन व डॉ. अक्रम पठाण विचार मांडणार आहेत. दुपारी साडेचार वाजता आंबेडकरी चळवळ आणि जाती अंताची क्रांती या विषयावर डॉ. अशोक पळवेकर, डॉ. प्रकाश राठोड हे विचार मांडतील. अध्यक्षस्थानी विचारवंत श्रावण देवरे राहणार आहेत. ५ वाजता कवी संमेलन तर समारोप हा ६ वाजता होणार आहे. प्रा. नंदन नांगरे यांच्या उपस्थितीत होणाºया या समारोपात डॉ. यशवंत मनोहर यांचे भाषण होणार आहे. यावेळी उपस्थितीचे आवाहन संयोजक डॉ. प्रकाश मोगले, हेमंत कार्ले, अरुण दगडू, डॉ. आदिनाथ इंगोले, प्रशांत वंजारे, गंगाधर ढवळे यांनी केले आहे़