"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:14 AM2019-03-04T05:14:25+5:302019-03-04T05:14:36+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळोवेळी टीका केली़

"Ambedkar should issue draft on Sangh" | "संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा"

"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा"

Next

नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळोवेळी टीका केली़ काँग्रेसला आरएसएसबाबत प्रेम असण्याचे कारण नाही. आरएसएसला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्यासाठी कोणता आराखडा आहे, हे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी लेखी द्यावे, आम्ही तो मान्य करू, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे केले.
महाआघाडीत सामील होण्याबाबत वंचित बहुजन आघाडीने रा.स्व. संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याची अट ठेवली आहे. यावर चव्हाण म्हणाले, काँग्रेसने नेहमीच संघाच्या कार्यप्रणाली आणि विचारधारेविरोधात भूमिका घेतलेली आहे़ त्यामुळे अ‍ॅड़ आंबेडकर यांना आरएसएससंदर्भात काँग्रेसकडून नेमके काय अपेक्षित आहे याचा मसुदा त्यांनी स्वत: द्यावा, आम्ही तो मान्य करू. मतविभाजन टाळण्यासाठी अ‍ॅड़ आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे ही सर्वांची इच्छा आहे़ राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला दोन, सीपीएमला एक जागा देण्याचा निर्णय झाला आहे़ त्याचवेळी सीपीआय, लोकतांत्रिक जनता दल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेकाप हे पक्षही महाआघाडीत सहभागी असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: "Ambedkar should issue draft on Sangh"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.