शेतातील विद्युत कुंपणाने घात केला; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:39 PM2023-08-01T12:39:03+5:302023-08-01T12:41:40+5:30

रानडुक्करांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेताला कुंपण घालून त्यात विद्युत प्रवास सोडण्यात आला होता 

ambushed by an electric fence in a field; Two died on the spot due to lightning, two were seriously injured | शेतातील विद्युत कुंपणाने घात केला; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी 

शेतातील विद्युत कुंपणाने घात केला; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी 

googlenewsNext

- दत्तात्रय कांबळे
मुखेड ( नांदेड) :
मुखेड तालुक्यातिल सकनुर येथील एका शेतकऱ्यांने रानडुक्करांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेताला तारेचे कुंपण घालून त्यात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. हे तारेचे कुंपण चार तरुणाच्या जीवावर बेतले असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे तरुण गंभीर जखमी आहेत. चौघेही सोमवारी रात्री ९. ३० वाजेच्या दरम्यान मासे, खेकडे पकडण्यासाठी नदीवर जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. 

तालुक्यातिल कुंद्राळा येथील शेतमालक सूर्यकांत  पाटील कुंद्राळकर यांची शेती सकनुर शिवारात तलावाच्या जवळ आहे. सकनुर येथील मोहन जाधव  हा शेती कसतो. पिकांचे रानडुकर, हरीण नुकसान करत असल्याने त्यांनी शेतास तारेचे कुंपण लावले असून त्यात रात्री विद्युत प्रवाह सोडला जातो. 
दरम्यान, सोमवारी रात्री गावातील संभाजी पुंडलिक नागरवाड (२१), शिवाजी रामदास सुरूमवाड ( २०), संजय मारुती नागरवाड ( २२ ), विजय संभाजी हंबीरे ( २२ ) हे चौघेजण मासे, खेकडे पकडण्यासाठी तलावाखालील नदीवर जात होते. तलावापासून जात असताना शेताच्या बांधाजवळ लावलेल्या विद्युत कुंपणाचा स्पर्श संभाजी याच्या पायास झाला,  त्यापाठोपाठ शिवाजी याचा देखील तारेस स्पर्श होऊन जोरदार विजेचा धक्का बसला. यावेळी शिवाजीचा हात विजय व संजय या दोघांना लागला. मात्र, विजय व संजय बाजूला फेकले गेले. तर तारेस चिटकून बसल्याने संभाजी व शिवाजी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

संजय आणि विजय यांच्यावर मुखेड येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वार गायकवाड यांनी दिली. माहिती मिळताच मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक भालचंद्र तिडके, पोलिस उप निरीक्षक गजानन काळे, पोलिस उप निरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: ambushed by an electric fence in a field; Two died on the spot due to lightning, two were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.