अमित भारद्वाजच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:28 AM2018-05-19T00:28:09+5:302018-05-19T00:28:09+5:30
गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी नांदेड पोलिसांनी भारद्वाज हा तपासात असहकार्य करीत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर न्यायालयाने भारद्वाजच्या कोठडीत २१ मे पर्यंत वाढ केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी नांदेड पोलिसांनी भारद्वाज हा तपासात असहकार्य करीत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर न्यायालयाने भारद्वाजच्या कोठडीत २१ मे पर्यंत वाढ केली आहे़
व्हर्चुअल करन्सी म्हणजेच अदृश्य चलनाचे मायाजाल देशभर पसरले आहे़ या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याने स्वत:ची गेन बिटकॉईन ही कंपनी स्थापन केली होती. आपल्या ओळखीचा फायदा घेत त्याने नांदेडमध्ये जवळपास १७५ बिटकॉईन गोळा केले होते़ त्याबदल्यात आकर्षक व्याज देण्याचे आमिष त्याने दिले होते. परंतु, त्यानंतर त्याने परतावा देण्याच्या बदल्यात बाजारात अतिशय कमी मूल्य असलेले एम कॅप हे चलन गुंतवणूकदारांना दिले.
नांदेडमध्ये आतापर्यंत अमित भारद्वाज याने ५ लाख रुपये किमतीचे तब्बल १७५ बिटकॉईन गुंतवणूकदाराकडून घेतले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारद्वाज याला दिल्ली विमानतळावर पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी भारद्वाज याच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. नांदेड पोलिसांनी ९ मे रोजी अमित भारद्वाज व महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेतले होते़
१० मे रोजी न्यायालयाने या दोघांनाही १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी पोलिसांनी अमित भारद्वाज हा तपासात सहकार्य करीत नसल्यामुळे कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती़ न्यायालयाने हा मुद्दा ग्राह्य धरत भारद्वाजच्या कोठडीत २१ मे पर्यंत वाढ केली़ तर हेमंत सूर्यवंशी याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून नांदेड पोलीस त्याला घेवून पुण्याकडे रवाना झाले आहेत़