शेजारील जिल्ह्यात लम्पि रोगाचा प्रादुर्भाव वाढला; नांदेडचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट
By शिवराज बिचेवार | Published: September 1, 2022 12:08 PM2022-09-01T12:08:18+5:302022-09-01T12:09:14+5:30
या रोगाचा प्रसार माशा, मच्छर, गोचीड व गोमासिपासून होतो
नांदेड- सध्या राज्यात धुळे, पुणे,अहमदनगर, जळगांव, अकोला, बीड व लातूर जिल्ह्यात लम्पि रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सध्या नांदेड जिल्ह्यात प्रादुर्भाव जरी नसला तरी प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घूगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मालवडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ भूपेंद्र बोधनकर यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.
लम्पि स्किनरोग हा गोट पॉक्स विषाणू (देवी) लम्पि स्किन रोग विषाणूमुळे गाय व म्हैस वर्गात होतो या मध्ये जनावरांना ताप येणे, शरीरावर घट स्वरूपाच्या गाठी येणे या शिवाय जनावरांच्या तोंडात, श्वसन नलिकेत व घस्यात गाठी येतात, दूध देण्याचे प्रमाण कमी होणे, गाभण जनावर गर्भपात होणे, ओढ काम करणाऱ्या जनावरांची कार्य क्षमता कमी होणे असें लक्षणे दिसून आल्यानंतर पशुपालकांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती द्यावी. तसेच बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून अलग ठेवावे निरोगी जनावरांना उपलब्ध करून दिलेल्या गोट पॉक्स लसीकरण करून घ्यावे व आजारी जनावरांना उपचार करून घ्यावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ भूपेंद्र बोधनकर यांनी केले आहे.
कशापासून हा आजार होतो
या रोगाचा प्रसार माशा, मच्छर, गोचीड व गोमासिपासून होतो
उपाययोजना काय ?
जनावरांचे गोठे फवारणी 20 टक्के इथर, क्लोरोफार्म 1 टक्के, फिनेल औषधे पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यावी