अंकिता देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 AM2021-04-09T04:18:39+5:302021-04-09T04:18:39+5:30
या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने पडताळणी केली. त्यावर यवतमाळ व अमरावती जात पडताळणी समितीने अहवाल सादर केला. या ...
या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने पडताळणी केली. त्यावर यवतमाळ व अमरावती जात पडताळणी समितीने अहवाल सादर केला. या अहवालावरून देशमुख यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी वरील कार्यालयाकडे कुठलाही प्रस्ताव सादर केला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे देशमुख यांच्याकडील जात वैधता प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे उपलब्ध अभिलेख्यावरून स्पष्ट हाेत असल्याचे यासंबंधीच्या निकालात नमूद करण्यात आले आहे. प्रतिवादी देशमुख यांच्या असलेल्या जात वैधता प्रमाणपत्रावर रुधा नथ्थुजी मते यांचे नाव असल्याचे जात पडताळणी समितीचा अहवाल सांगताे. एकंदरीत प्रतिवादी हे अस्तित्वातच नाहीत. त्यांचा भास करून तसेच प्रशासनाची दिशाभूल करून त्या जिल्हा परिषद सदस्य पदावर कार्यरत असल्याचे स्पष्ट करीत अप्पर विभागीय आयुक्तांनी देसाईराव देशमुख यांना जिल्हा परिषद सदस्य या पदावरून जात वैधता प्रमाणपत्र बनावट दिले याकारणाने अनर्हत ठरविण्यात येत असल्याचे निकालात नमूद केले आहे.