कोरोना महामारीची वर्षपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:23+5:302021-04-22T04:18:23+5:30
चौकट------------- वर्षभरात १३२२ जणांचा मृत्यू २२ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर या रुग्णावर शासकीय वैद्यकीय ...
चौकट-------------
वर्षभरात १३२२ जणांचा मृत्यू
२२ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र ३०एप्रिल रोजी उपचारादरम्यान या बाधिताचा मृत्यू झाला. मागील वर्षभरात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरूच होता. मात्र मागील महिनाभरापासून कोरोनाची सुनामी आल्याचे चित्र आहे. वर्षभरात तब्बल १३२२ जणांचा कोरोनाचे बळी घेतला आहे.
आरोग्य यंत्रणा झाली भक्कम
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी जास्तीत जास्त रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करीत आहेत. सध्या नांदेडमध्येच ५ कोविड सेंटर कार्यरत आहेत. या बरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुका ठिकाणी शेकडो रुग्णावर उपचार केले जात आहेत. सुरुवातीला व्हेन्टीलेटरसह इतर साधन सुविधांची कमतरता होती. मात्र यातही आता वाढ झाली आहे.
५५ हजार जणांनी केली कोरोनावर मात
रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे काळजात धस्स करणारे आहेत. मात्र त्यातही दिलासा देणारी बाब म्हणजे दररोज कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आजवर सव्वाचार लाखाहून अधिक जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यातून ७१ हजार ७९१ बाधित निष्पन्न झाले. यातील तब्बल ५५ हजार ९८० जणांनी कोरोनावर मात केली.