संतापजनक ! मध्यरात्री अत्यवस्थ रुग्णाला कर्मचाऱ्यांनी दाखविला बाहेरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 03:07 PM2020-09-12T15:07:24+5:302020-09-12T15:08:22+5:30
सिटीस्कॅनसाठी रुग्ण प्रतिसाद देत नव्हते़ त्यामुळे कर्मचारी वैतागले होते़
नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्या एका रुग्णाला गुरुवारी रात्री एक वाजता बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला़
वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी या रुग्णाला बाहेर काढले़ त्यामुळे पोलीस चौकीच्या आसऱ्याने दोन महिला आणि या रुग्णाला रात्र काढावी लागली़ सकाळी दाखल न करुन घेतल्याने उपचाराविनाच ते हिंगोली या गावी परतले़ हिंगोली येथील शंकर वामन हे वाशिम जिल्ह्यात येथून दुचाकीवरून परताना त्यांचा अपघात झाला़ त्यात चिमुकल्याचाही मृत्यू झाला होता़ डोक्याला दुखापत झाल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना विष्णूपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले़ परंतु सिटीस्कॅनसाठी शंकर वामन हे प्रतिसाद देत नव्हते़ त्यामुळे कर्मचारी वैतागले होते़ त्याचाच राग काढत कर्मचाऱ्यांनी वामन यांच्यावर काढला.