जागतिक गुराखी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिकांना खिळवून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 05:19 PM2019-01-28T17:19:47+5:302019-01-28T17:25:54+5:30

विद्यार्थ्यांच्या विविध कलांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. 

At the annual Gurakhi literature meeting, students were thrilled by the artistic innovation | जागतिक गुराखी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिकांना खिळवून ठेवले

जागतिक गुराखी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिकांना खिळवून ठेवले

googlenewsNext

कंधार (नांदेड ) : गुराखी गडावरील २७ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विविध कलांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. 

गुराखीगडावर २७ वे जागतिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी कलावंतांनी आपले मौखिक साहित्य, कला, गीत, गवळण, भजन, रान शिवारातील गीते, जात्यावरील गीते, भुलई, , मनकवडे, गोंधळी, देवीचा जागर आदीचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर विद्यार्थ्यांनी लोककला, लोकगीते, आदिवासी नृत्य, शेतकरी गीते, लावणी, पोवाडे आदी कलाप्रकारांचे सादरीकरण केले. यात कंधार, कुरूळा, दिग्रस, लोहा, सोनखेड, बारूळ, हाळदा,नांदेड, औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पहा व्हिडीओ :

Web Title: At the annual Gurakhi literature meeting, students were thrilled by the artistic innovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.