आणखी २७ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:27+5:302021-04-23T04:19:27+5:30

चौकट....... १२९३ जणांनी केली कोरोनावर मात गुरुवारी बाधित निघालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे सुखद चित्र दिसून ...

Another 27 patients died | आणखी २७ रुग्णांचा मृत्यू

आणखी २७ रुग्णांचा मृत्यू

Next

चौकट.......

१२९३ जणांनी केली कोरोनावर मात

गुरुवारी बाधित निघालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे सुखद चित्र दिसून आले. एकाच दिवसात १२९३ बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजवरच्या कोेरोनामुक्त रुग्णांची संख्या ५७ हजार २७३ एवढी झाली या आहे. यात विष्णुपूरी रुग्णालयातील १८, मनपाअंतर्गत गृहविलगीकरणातील ७१९, भोकर १, देगलूर १३, अर्धापूर २०, उमरी २४, खाजगी रुग्णालय १०७, मुखेड १३०, कंधार २४, किनवट ६४, हिमायतनगर २९, बारड ४, हदगाव ११, आयुर्वेदिक महाविद्यालय २९, माहूर १७, नायगाव २, लोहा ३२ तर मांडवी कोविड केअर सेंटरमधील १ जण कोरेानामुक्त झाला.

२४० जणांची प्रकृती गंभीर...

नांदेड जिल्ह्यात सध्या १४ हजार ८ सक्रीय रुग्ण असून या रुग्णांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. यातील २४० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. यामध्ये नांदेड मनपाअंतर्गत ५ हजार ९२३ तर जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृहविलगीकरणात ३ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हयात उपचारानंतर बाधित रुग्ण घरीच बरे होण्याचे प्रमाण ७८.५७ टक्के आहे.

Web Title: Another 27 patients died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.