रस्ते कामाच्या आणखी ३४० कोटींच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:54+5:302020-12-22T04:17:54+5:30
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी थेरबन, सोमठाणा किनी या प्रमुख जिल्हा मार्ग २० वरील रेल्वे ओलांडणी पुलाचे बांधकाम ...
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी थेरबन, सोमठाणा किनी या प्रमुख जिल्हा मार्ग २० वरील रेल्वे ओलांडणी पुलाचे बांधकाम ६० कोटी रुपये खर्चून करण्यात येणार आहे, तर उमरी तालुक्यातील हदगाव- तामसा-भोकर-उमरी-कारेगाव, लोहगाव या राष्ट्रीय मार्ग २५१ वर ९० कोटी रुपये खर्चून उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. याबरोबरच धर्माबाद तालुक्यातील राज्य सीमा बन्नाळी, धर्माबाद, शिरसखोड, बामणी, मनूरसंगम या प्रमुख जिल्हा मार्ग ४१ वर १०० कोटी रुपये खर्चून रेल्वे ओलांडणी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे, तर नांदेड तालुक्यातील नांदेड पश्चिम बाह्य वळण रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचे पोहोचमार्गासह बांधकाम ९० कोटी रुपये खर्चून करण्यास मान्यता मिळाली आहे.
चौकट................................................
हिंगोली-धामणी मार्गावरही होणार उड्डाण पूल
रेल्वे सुरक्षा कामे अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ३१ कोटी ९९ लाखांच्या एका उड्डाण पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. डिसेंबर २०२० मधील पुरवणी अर्थसंकल्पात हे काम मंजूर झाले असून, चालू आर्थिक वर्षासाठी २.४२ कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. हिंगोली, धामणी मार्गावर लेवल क्रॉसिंग क्रमांक १४४ येथे ३१.९९ कोटी खर्चून हा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे.