नागरी समस्या सोडून खासदारांची उपस्थिती फक्त भंडाऱ्याच्या कार्यक्रमात: आ. अमर राजूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 05:27 PM2022-09-27T17:27:56+5:302022-09-27T17:28:08+5:30
खासदार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, निवेदने स्वीकारण्यासाठी ते भेटत नाहीत
अर्धापूर (नांदेड) : नांदेडचे खासदार नागरी समस्या सोडून फक्त भंडारे व अंत्यविधीच्या कार्यक्रमा पुरते आहेत, अशी बोचरी टीका आ. अमर राजूरकर यांनी येथे केली. आज अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्धापूर तालुक्यातील देळुब बु. येथे एका कार्यक्रम ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात. आता आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. खासदार केवळ अंत्यविधी व भंडाऱ्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, निवेदने स्वीकारण्यासाठी ते भेटत नाहीत, अशी टीका आ. अमर राजूरकर यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर नाव न घेता केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, सरचिटणीस संजय लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, संचालक संजय लोणे, नासेरखान पठाण, पप्पू बेग, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरूपती कोंढेकर, सरपंच आजेरखॉं पठाण, उपसरपंच अनिल थोरात, रंजित सिंघ, शिवलिंग स्वामी आदींची उपस्थिती होती.