शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करणे सोडून कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न: संभाजीराजे
By शिवराज बिचेवार | Published: September 9, 2024 11:40 AM2024-09-09T11:40:02+5:302024-09-09T11:40:32+5:30
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे नांदेड जिल्ह्यात
नांदेड - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्याऐवजी कृषिमंत्री धनंजय मुंडे मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत, हे कृषिमंत्र्यांना शोभते का, अशी टीका स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छ्त्रपती संभाजीराजे यांनी केली.
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे आज नांदेड जिल्ह्यात आले होते. हदगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. उंचाडा, मारलेगाव आणि धानोरा येथे त्यांनी पिकांची पाहणी केली. आमदार, खासदार तर इकडे फिरकलेच नाहीत पण ज्यांची जबाबदारी आहे ते कृषिमंत्री इकडे पाहणी करण्याचे सोडून सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. महाराष्ट्राला हे शोभणारे नाही असे संभाजीराजे म्हणाले.