बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:37+5:302021-02-11T04:19:37+5:30

या दोन योजना राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध ...

Appeal to file loan proposal for Bijbhandaval Yojana | बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

googlenewsNext

या दोन योजना राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड/मतदान कार्ड/पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे, त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बिल, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्याबाबत शंभर रुपयांच्या बाँडवर प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून घोषणापत्र देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरू गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच. डी. गतखणे यांनी केले आहे.

Web Title: Appeal to file loan proposal for Bijbhandaval Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.