शाळा बंद असल्याने मुलांना माेबाईलच्या सवयीपासून दूर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:05+5:302021-08-22T04:22:05+5:30
मार्च २०२० मध्ये काेराेना संकट उद्भवले. सर्व व्यवहारांसह शाळाही बंद झाल्या. या शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू झाले ...
मार्च २०२० मध्ये काेराेना संकट उद्भवले. सर्व व्यवहारांसह शाळाही बंद झाल्या. या शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. यासाठी मुलांच्या हाती पालकांनी माेबाईल दिला आहे. मात्र या माेबाईलपासून मुलांना दूर कसे करायचे, हाच प्रश्न आता प्रत्येक पालकांसमाेर आहे. माेबाईल नसेल तर मुले आपला माेर्चा टीव्हीकडे वळवत आहेत. या सर्व परिस्थितीत मुलांसह पालकवर्गही चिडचीड करीत आहे.
मुलांच्या समस्या...
दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले कंटाळली आहेत. शाळा कधी सुरू हाेईल याची उत्सुकता त्यांना लागली आहे.
घरी असल्याने पालकांचा सातत्याने अभ्यासासाठीचा तगादा मुलांच्या मागे आहे. मुले याला वैतागली असून आमची शाळाच बरी असे म्हणत आहेत.
पालकांच्या समस्या...
ऑनलाईन क्लास संपल्यानंतर मुले रिकामी राहत आहेत. त्यामुळे घरातील काेणत्याही व्यक्तीचा माेबाईल घेऊन ते गेम खेळत आहेत. तसेच टीव्हीवरील कार्टून पाहत आहेत.
यामुळे मुलांच्या आराेग्यावरही परिणाम हाेत आहे. याचीच पालकांना चिंता आहे.
सातत्याने माेबाईल व टीव्हीचा वापर केल्यास मुलांच्या मानसिकतेवर परिणाम हाेताे. गेममधील हिंसक चित्रातून मानसिकताही हिंसक बनत असते. सातत्याने माेबाईल बघितल्यास डाेळेही कमकुवत हाेतात. त्यातच मुलांचा चिडचिडेपणाही वाढताे.
- डाॅ. रामेश्वर बाेले,
काेराेनामुळे बंद असलेल्या शाळांमुळे मुले घरीच आहेत. मुलांचा ओढा आता माेबाईल व टीव्हीकडे आहे. यातून मैदानी खेळ बंदच आहे. परिणामी मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम आगामी काळातील आयुष्यावरही हाेऊ शकताे.
-डाॅ. बी. डी. जाेशी