‘महाडीबीटी’ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:18+5:302021-03-17T04:18:18+5:30

या योजनेद्वारे एका अर्जाद्वारे सर्वच लाभ देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणालीसाठी विकसित करण्यात ...

Application process started under ‘MahaDBT’ | ‘महाडीबीटी’ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू

‘महाडीबीटी’ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू

Next

या योजनेद्वारे एका अर्जाद्वारे सर्वच लाभ देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणालीसाठी विकसित करण्यात आली आहे. संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकऱ्यांनी स्वतछचामोबाईल संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएमसी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावी. सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुनच शेतकऱ्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यासाठी यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. या कामासाठी लाभार्थ्यांनी जवळील सामुहिक सेवा केंद्राची मदत घ्यावी. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा.

चौकट------------

यासाठी करता येईल अर्ज

फलोत्पादन योजनेतंर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षीकापालन, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चंग तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा लागवड, डाळींबा लागवड, मोसंबी लागवड, पेरु लागवड, सीताफळ लागवड तसेच इतर फळबाग लागवड योजना, शेततळ्यातील पन्नी, सामायिक शेततळे तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे, प्रक्रिया संच, पावर टिलर, बैलचलित अवजारे, मनुष्य अवजारे, चलित अवजारे, कल्टीवेटर, कापणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, मल्बंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर, वखर आदी उपकरणासाठी अर्ज करता येईल.

Web Title: Application process started under ‘MahaDBT’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.