आमदारांच्या शिफारसी झुगारून बांधकाम अभियंत्यांच्या नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:27+5:302021-07-31T04:19:27+5:30
सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या मर्जीतील अभियंत्यांच्या नावाची शिफारस केली हाेती. मात्र, ही शिफारस झुगारून त्या आमदारांच्या बालेकिल्ल्यात तिसऱ्याच ...
सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या मर्जीतील अभियंत्यांच्या नावाची शिफारस केली हाेती. मात्र, ही शिफारस झुगारून त्या आमदारांच्या बालेकिल्ल्यात तिसऱ्याच व्यक्तीची वर्णी लावली गेली. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येच असंताेष पाहायला मिळते. आमच्या मतदार संघातच आम्हाला किंमत नसेल तर आमदार राहून उपयाेग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. किमान सत्ताधारी आमदारांनाही विश्वासात घेतले जात नाही, त्यांना किंमत दिली जात नाही, अशी ओरड आहे.
चाैकट....
अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत
१२ अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पदाेन्नतीसाठी महसुली पसंती देऊनही अद्याप मुख्य अभियंता पदावर प्रत्यक्ष नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. कनिष्ठ अभियंते तर नऊ महिन्यांपासून पदाेन्नतीवरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. उपअभियंत्यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.
चाैकट....
साईड ब्रँचलाही आली ‘किंमत’
सार्वजनिक बांधकाम खात्यात साईड ब्रँच अर्थात अकार्यकारी पदावर सहसा कुणी जाण्यास तयार हाेत नाही. मात्र, सध्या या साईड ब्रँचलाही नियुक्तीसाठी ‘किंमत’ आली आहे. बांधकाम राज्यमंत्र्यांच्या कार्यालयातील यंत्रणा त्यासाठी सूत्रे हलवित असून चक्क ‘प्रादेशिक’ स्तरावर जाऊन बैठका घेतल्या जात आहेत.