कोविड उपचारासाठी प्रशासकीय यंत्रणांना योग्य त्या खबरदारीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:52+5:302021-03-16T04:18:52+5:30

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सर्व विभाग प्रमुखांची ...

Appropriate precautionary instructions to the administration for covid treatment | कोविड उपचारासाठी प्रशासकीय यंत्रणांना योग्य त्या खबरदारीचे निर्देश

कोविड उपचारासाठी प्रशासकीय यंत्रणांना योग्य त्या खबरदारीचे निर्देश

Next

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी , अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांची उपस्थती होती.

जिल्ह्यात यापुर्वी कोरोना उपचारासाठी प्रत्येक तालुकानिहाय जी यंत्रणा उभी केली होती त्यात आरोग्याच्यादृष्टिने अत्यावश्यक उपचाराच्या सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष चालणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून प्रशासकीय यंत्रणाना निर्देश दिले.

जिल्ह्यातील विविध शासकीय शैक्षणिक संस्थाच्या इमारती कोविड सेंटरसाठी तयार ठेवण्याच्या दृष्टीने त्याची पाहणी करून तेथे सर्व प्रकारच्या प्राथमिक स्वरुपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात. आरोग्याबाबतच्या सोयी सुविधा सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणानी अधिक दक्ष असावे असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभाच्यावतीने सुक्ष्म नियोजन झाले आहे. कोरोना बधितांना ऑक्सीजन व औषधी कमी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जे कोरोना बाधित गृहविलगिकरणात आहेत त्यांनी बाहेर पडून इतरांच्या आरोग्याला बाधा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून काळजी घेण्यासाठी शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. ज्या परिसरात कोरोना बाधिताची संख्या अधिक प्रमाणात आढळून आली आहे. अशा परिसराचे सुक्ष्म नियोजन करुन तेथे आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बैठकीत ठेवण्यात आली.

Web Title: Appropriate precautionary instructions to the administration for covid treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.