खावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:28 AM2021-05-05T04:28:39+5:302021-05-05T04:28:39+5:30

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला ...

Approved applications of 10,284 tribal families in the district for Khawati scheme | खावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर

खावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर

Next

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला होता. पालकमंत्री चव्हाण यांनीही हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी खावटी योजना पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला व १ मे रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.

या खावटी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रुपयांचा लाभ दिला जाईल. यामध्ये दोन हजार रुपये किमतीचे अन्नधान्य व इतर वस्तू, तसेच दोन हजार रुपये रोख बँक खात्यामार्फत दिले जाणार आहेत. या योजनेसाठी राज्यस्तरावर सुमारे ४८२ कोटी रुपये खर्च केले जातील. प्रामुख्याने दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

चौकट........................

किनवट तालुक्याला सर्वाधिक लाभ

नांदेड जिल्ह्यामध्ये या योजनेचा सर्वाधिक लाभ आदिवासीबहूल किनवट तालुक्याला मिळणार असून, आजपावेतो येथील ५ हजार १२७ अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल माहूर १ हजार ७७२, हदगाव १ हजार ७६५, हिमायतनगर ८०७, तर भोकर तालुक्यातील ६९२ अर्जदार या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत. या योजनेबाबत बोलताना पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, यापूर्वी खावटी कर्जरूपात दिली जायची व ते कर्ज नंतर परत करावे लागायचे. या योजनेमध्ये मिळणारी रक्कम हे अनुदान स्वरूपात असणार आहे.

Web Title: Approved applications of 10,284 tribal families in the district for Khawati scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.