इसापूरच्या पाण्याकडे अर्धापूरकरांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:52 AM2019-07-06T00:52:20+5:302019-07-06T00:52:56+5:30
अर्धापूर तालुक्यातील सिंचन हे इसापूरच्या पाण्यावर अवलंबून असून यंदा इसापूरच्या प्रकल्पात किती पाणीसाठा याकडे अर्धापूरकरांचे लक्ष लागले आहे़
पार्डी : अर्धापूर तालुक्यातील सिंचन हे इसापूरच्या पाण्यावर अवलंबून असून यंदा इसापूरच्या प्रकल्पात किती पाणीसाठा याकडे अर्धापूरकरांचे लक्ष लागले आहे़
गेल्या काही वर्षापासून पावसाळा कमी होत असल्याने व इसापूर धरणातील जलसाठा पूर्ण क्षमतेने भरत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे रबी हंगामातील पिके हातून गेली आहे़ गत वर्षात इसापूर धरणातून सात पाणी पाळ्या देण्यात आल्या होत्या़ रब्बी हंगामातील पिकासाठी चार तर उन्हाळ्यात तीन पाणी मिळाले होते़ मात्र केळीला पाणी न मिळाल्याने केली वाळून गेली़ काही शेतकऱ्यांनी केळी कापून टाकली आहे़ तालुक्यातील केळी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीचे उत्पादन घेतात़ ही केळी इसापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत़
मात्र गेल्या काही वर्षांपासून इसापूर धरणातून पाणी पाळ्या कमी मिळत असल्याने केळीसह अन्य पिकावर त्याचा परिणाम झाला आहे़ रब्बी हंगामातील पिके कमी घेतली गेली़ दरवर्षी इसापूर प्रकल्पातून मिळणाºया पाण्याची कपात करण्यात येत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़
पाणीपाळ्या मिळण्याच्या आशेवर पिकांचे नियोजन
पुढील काळात इसापूर धरणातून जास्त पाणी पाळ्या मिळतील या आशेवर शेतकरी केळी पिकाची लागवड करण्याचा विचार करीत आहेत़ यंदा तरी इसापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होईल़ जलसाठ्यात वाढ झाली तर पाणी पाळ्या जास्त मिळतील़ या आशेवर तालुक्यातील शेतकरी केळीचे नियोजन करीत आहेत़ सोयाबीन पीक घेऊन केळीची लागवड करण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा मूग किंवा उडीद घेऊन केळीची लागवड करावी का, याबाबतही शेतकरी चिंतेत आहेत़