अर्धापूर नगरपंचायतींच्या सफाई कामगारांचे काम बंद अंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:21+5:302020-12-26T04:14:21+5:30
अर्धापूर : कंत्राटी स्वच्छता कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावा, विनाअट कामावर घेण्यात यावे, आठवड्यातून एकदा सुटी देण्यात यावी ...
अर्धापूर : कंत्राटी स्वच्छता कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावा, विनाअट कामावर घेण्यात यावे, आठवड्यातून एकदा सुटी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी नगरपंचायत सफाई कामगारांनी श्री स्वामी सर्व्हिसेस, पुणे या कंत्राटी कंपनीविरुद्ध गुरुवारपासून काम बंद अंदोलन सुरू केले आहे.
कामगारांनी कंपनीच्या मनमानीला कंटाळून अपल्या मागणीसाठी काम बंद अंदोलन सुरू केले आहे. स्वच्छता कर्मचारी विजू सावळे, सतीश कावळे, सचिन रहाटकर, साहेबराव सरोदे मालनबाई डोंगरे, उषाबाई सूर्यवंशी, भारतबाई कदम, अरुणाबाई सरोदे आदी पुरुष व महिला कर्मचाऱ्यांच्या सह्या या निवेदनावर आहेत.
भाजपाच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने विविध प्रकारे अंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे देण्यात आला असून, या निवेदनावर युवा नेते विराज देशमुख, शहराध्यक्ष विलास साबळे, नगरसेवक शिवराज जाधव, तुकाराम साखरे, योगेश हळदे, वैभव माटे, तुकाराम माटे यांच्या सह्या आहेत. याबरोबर याला शिवसेनेचा पाठिंबा असून, शिवसेना शहरप्रमुख सचिन येवले यांनी अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे केले आहे.