या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:19+5:302021-08-23T04:21:19+5:30
नांदेड : कोरोनाकाळात अनेक दिवस लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा बंदच होती. त्यामुळे जागेवरच उभ्या असल्याने अनेक बसेस आता भंगारातच ...
नांदेड : कोरोनाकाळात अनेक दिवस लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा बंदच होती. त्यामुळे जागेवरच उभ्या असल्याने अनेक बसेस आता भंगारातच काढण्याची वेळ आली आहे. त्यात देखभाल आणि दुरुस्तीसाठी महामंडळाकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे या बसेस आहेत की, गळक्या पत्र्यांची घरे? असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
नांदेड आगाराकडून दररोज मोठ्या प्रमाणात नियते चालविण्यात येतात. आता सर्वच व्यवहार खुले झाल्यामुळे बसेसला प्रवासीही चांगले मिळत आहेत. परंतु अनेक बसच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. तर छतालाही अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पाऊस सुरू होताच या बसेस गळतात. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे.
गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही
n कोरोनामुळे अनेक महिने वाहतूक सेवा बंद असल्याने गाड्यांचा मेंटेनन्स वाढला आहे. त्यात खराब रस्त्यांमुळेही अनेक बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. परंतु त्यांच्या दुरुस्तीसाठी महामंडळाकडे पैसेच नाहीत.
n कोरोनामुळे एसटी महामंडळ तोट्यात गेले आहे. त्यात वाहक आणि चालकांचे वेतन काढणेही अवघड होऊन बसले आहे. वेतनासाठी कर्मचा-यांनी काही दिवसांपूर्वीच आंदोलन केले होते.
आगारप्रमुखांचा कोट
कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा झाला आहे. आता बससेवा पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे बसेसच्या दुरुस्तीचेही काम सुरू आहे. - आगारप्रमुख