नांदेड जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:19 AM2018-04-14T00:19:59+5:302018-04-14T00:19:59+5:30

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण ८ लाख २४ हजार ८२० हेक्टर क्षेत्र असून गतवर्षी ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झाली होती़ त्यात यंदा ३ हजार हेक्टरची वाढ होवून जवळपास ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला असून त्यानुसार बी-बियाणे, खताचे नियोजन केले जात आहे़

The area of ​​Kharif in Nanded district will be increased | नांदेड जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढणार

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढणार

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाचे नियोजन : खत,बी-बियाणांचा तुटवडा भासणार नाही

श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण ८ लाख २४ हजार ८२० हेक्टर क्षेत्र असून गतवर्षी ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झाली होती़ त्यात यंदा ३ हजार हेक्टरची वाढ होवून जवळपास ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला असून त्यानुसार बी-बियाणे, खताचे नियोजन केले जात आहे़
गतवर्षी बोंडअळीमुळे उत्पन्नात झालेली घट आणि अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाल्याने यंदा बरेच शेतकरी कापूस लागवड घटवून सोयाबीन, हळद आणि इतर पिकांना प्राधान्य देतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे़ कृषी विभागाने यंदा कापसाचे लागवड क्षेत्र अडीच लाख हेक्टर प्रस्तावित केले आहे़ गतवर्षी २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर होते़
सोयाबीन, तूर पेरा क्षेत्र आहे तेच राहील़ परंतु, ज्वारीच्या पेऱ्यात दुपटीने वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे़ ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १२ हजार ३४४ हेक्टर असून यंदा १ लाख १०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी होईल़ गतवर्षी ६१ हजार ४९८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती़ तर ३ लाख १८ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरा होईल़ गतवर्षी ३ लाख १७ हजार ९५७ हेक्टरवर पेरा झाला होता़ त्यात केवळ ४३ हेक्टरची वाढ प्रस्तावित केली़ यंदा ६२ हजार ८०० हेक्टरवर तूर पीक प्रस्तावित आहे़ तसेच तृणधान्य १ लाख ३ हजार १०० हेक्टर, कडधान्य १ लाख २७ हजार ८००, इतर ६ हजार ३०० हेक्टर तर कापूस अडीच लाख हेक्टरवर, अशी एकूण ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर यंदा खरीप पेरणी होईल़ कृषी विभागाने अजित १५५- अडीच लाख पाकिटे, भक्ती, मल्लिका - दीड लाख पाकिटे, कावेरी कंपनीचे जादू, जॉकपॉट, एटीएम- दीड लाख पाकिटे, राशी कंपनीचे अडीच लाख पाकिटे, अंकुर-१ लाख पाकिटे, मोन्सेंटो, ब्रह्मा-५० हजार पाकिटे, बायर फस्ट क्लास-५० हजार, युवा बिनधास्त - ५० हजार, डॉ़ डॉ़ ब्रँड ७३५१-५० हजार पाकिटे, विठ्ठल-५० हजार तर इतर कंपन्यांची ६८ हजार अशा एकूण १२ लाख ५३ हजार पाकिटांची मागणी प्रस्तावित आहे़ प्रस्तावित ३ लाख १८ हजार हेक्टरवरील सोयाबीन पेºयासाठी सार्वजनिक ५४ हजार तर खाजगी २३ हजार ९१० क्विंटल असे एकूण ७७ हजार ९१० क्विंटल बियाणाची मागणी आहे़

कृषी विभागाने खरिपासाठी कापूस बियाणांच्या १२ लाख ५३ हजार पाकिटांची मागणी केली़ यात बीटी कापूस १२ लाख १८ हजार, नॉन बीटी १० हजार तर सुधारित वाणाच्या २५ हजार पाकिटांचा समावेश आहे़
एचटीबीटी कापूस बियाणांची लागवड झाल्याने यवतमाळसह राज्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले़ सदर बियाणांचा पुरवठा आंध्र्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात राज्यांतून झाल्याचेही समोर आले होते़ या हंगामात एचटीबीटी बियाणे अवैधरित्या शेतकºयांपर्यंत पोहोचणार नाही याकरिता कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १६ अशा एकूण १७ भरारी पथकांची स्थापना केली आहे़
शेतकºयांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बी-बियाणे खरेदी करावे, दुकानदाराची स्वाक्षरी असलेल्या पक्क्या पावत्या घ्या, पावती आणि वेस्टन, पिशवी, टॅग व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे़ सीलबंद, मोहरबंद असलेली पाकिटे खरेदी करावीत, पाकिटावरील अंतिम मुदत पहावी, छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ़ टी़ एस़ मोेटे, जि़ प़ चे कृषीविकास अधिकारी पंडित एस़ मोरे यांनी केले आहे़

Web Title: The area of ​​Kharif in Nanded district will be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.